मराठी बातम्या /बातम्या /Viral /

प्रेशर कुकरमध्ये डोकं अडकल्यानं चिमुकला तळमळला; अखेर डॉक्टरांनी निवडला हा पर्याय

प्रेशर कुकरमध्ये डोकं अडकल्यानं चिमुकला तळमळला; अखेर डॉक्टरांनी निवडला हा पर्याय

या लहान मुलानं खेळत असताना आपलं डोकं कुकरमध्ये घातलं. यानंतर त्यानं भरपूर प्रयत्न केला मात्र त्याचं डोकं बाहेर निघालं नाही.

या लहान मुलानं खेळत असताना आपलं डोकं कुकरमध्ये घातलं. यानंतर त्यानं भरपूर प्रयत्न केला मात्र त्याचं डोकं बाहेर निघालं नाही.

या लहान मुलानं खेळत असताना आपलं डोकं कुकरमध्ये घातलं. यानंतर त्यानं भरपूर प्रयत्न केला मात्र त्याचं डोकं बाहेर निघालं नाही.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 31 ऑगस्ट : आपल्या सर्वांना माहिती आहे, की लहान मुलं अतिशय मस्ती करतात. मात्र, काही वेळा हीच गोष्ट अतिशय महागात पडते. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे, या घटनेत एका मुलाचं डोकं प्रेशर कुकरमध्ये अडकलं (Head Stuck in Pressure Cooker). यानंतर त्याला प्रचंड त्रास होऊ लागला. खूप प्रयत्न करूनही घरचे लोक त्याचं डोकं कुकरमधून बाहेर काढू शकले नाहीत. यानंतर त्याला रुग्णालयात (Hospital) घेऊन जाण्यात आलं. दोन तासाच्या प्रयत्नांनतर अखेर डॉक्टरांना (Doctor) या मुलाचं डोकं बाहेर काढण्यात यश आलं.

समोर आलेल्या वृत्तानुसार, या लहान मुलानं खेळत असताना आपलं डोकं कुकरमध्ये घातलं. यानंतर त्यानं भरपूर प्रयत्न केला मात्र त्याचं डोकं बाहेर निघालं नाही. मात्र, काही वेळानं जेव्हा मुलाला त्रास होऊ लागला तेव्हा घरचेही घाबरले. कुटुंबीयांनीही त्याच्या डोक्यातून हा कुकर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही फायदा झाला नाही. यानंतर कुटुंबीय या मुलाला घेऊन राजामंडी येथील एका खासगी रुग्णालयात गेले. इथे डॉक्टरांची टीम लगेगच या मुलाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेली.

एका दमात बाटलीभर व्होडका पिणं जीवावर बेतलं, भलताच स्टंट करताना तरुणाचा मृत्यू

डॉक्टरांनाही सुरुवातीला या मुलाचं डोकं प्रेशर कुकरमधून बाहेर काढणं शक्य झालं नाही. मात्र, नंतर डॉक्टरांनी ग्लाइडर मशीन मागवली. यानंतर हळूहळू कुकर कापला गेला. डॉ. फरहत खान यांनी सांगितलं, की हा मुलगा प्रचंड घाबरलेला होता. त्याचं डोकं कुकरमध्ये अडकलं होतं. जेव्हा ग्लाइडर मशीननं कुकर कापला जात होता, तेव्हा लहान मुलगा घाबरला होता. मात्र, अखेर दोन तासाच्या प्रयत्नांनतर त्याचं डोकं कुकरमधून बाहेर काढण्यात यश आलं.

नवरदेवाचं कृत्य पाहून भडकली नवरी; खुर्चीत मांडला ठाण, वरमाला घालायलाही तयार नाही

या लहान मुलाच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे. यामुळे डॉक्टरांनी त्यांच्याकडून पैसेही घेतले नाहीत. डॉक्टरांनी सांगितलं, की आता या मुलाची प्रकृती स्थिर आहे. त्याला घरी पाठवण्यात आलं आहे. ही घटना ऐकून लोक हैराण झाले आहेत. यामुळे बहुतेक लोक हेच म्हणत आहेत की आपल्याला लहान मुलांवर लक्ष ठेवायला हवं कारण त्यांची थोडी मस्तीदेखील मोठ्या संकटात बदलू शकते.

First published:

Tags: Viral news