मराठी बातम्या /बातम्या /Viral /

दुकानात शिरून भल्या मोठ्या पालीने घातला गोंधळ; ग्राहकांमध्ये दहशत

दुकानात शिरून भल्या मोठ्या पालीने घातला गोंधळ; ग्राहकांमध्ये दहशत

ही महाकाय पाल पाहून लोकांमध्ये दहशत पसरली आहे.

ही महाकाय पाल पाहून लोकांमध्ये दहशत पसरली आहे.

ही महाकाय पाल पाहून लोकांमध्ये दहशत पसरली आहे.

    सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक भली मोठी पाल (giant monitor lizard) दुकानात घुसली आहे, यामुळे तेथे मोठा गोंधळ उडाला आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ थायलँडमधील 7 इलेव्हन आउटलेट (7 Eleven outlet in Thailand) मधील आहे. हा व्हिडिओ थाई ट्रॅव्हल एजेन्सी मुंडो नोमादा (Thai travel agency Mundo Nomada) यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. हैराण करणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक भलामोठा सरपटणारा प्राणी स्टोअरमधील कपाटावरुन सरपटताना दिसत आहे. यादरम्यान या भल्या मोठ्या पालीने दुकानातील अनेक सामान खाली पाडले आहेत. घाबरलेले ग्राहक लांब उभे राहून ओरडत असल्याचे दिसून येत आहे. ही भलीमोठी पाल कपाटावर चढली होती व वर जाऊन बसली होती. यावेळी स्टोअरमधील लोक व्हिडिओ करीत होते. हे ही वाचा-VIDEO - आता माझी सटकली! रिकामं भांडं पाहून भुकेला कुत्रा मालकासमोर गेला आणि... इंटरनेटवर हा व्हिडिओ जलद गतीने व्हायरल होत आहे आणि या व्हिडिओला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आलं आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, हे एका वाईट स्वप्नासारखं आहे. यावर काही जणं मजेशीरही कमेंट करीत आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंडो नोमाडाने आणखी एका ट्वीटमध्ये सरपटणाऱ्या जीवाबद्दल माहिती दिली आहे. तुम्ही सहजपणे बँकॉक आणि थायलँडच्या अन्य ठिकाणी मोठ्या आकाराची पाल पाहू शकता.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Photo viral, Thailand

    पुढील बातम्या