मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हाडं गोठवणाऱ्या बर्फासारख्या थंड पाण्यात 'तो' 12 तास राहूनही राहिला जिवंत!

हाडं गोठवणाऱ्या बर्फासारख्या थंड पाण्यात 'तो' 12 तास राहूनही राहिला जिवंत!

 पाण्यात उडी मारल्यानंतर नेमकं काय काय झालं, हे त्याला तितकंसं आठवत नसल्याचं त्याने नंतर सांगितलं.

पाण्यात उडी मारल्यानंतर नेमकं काय काय झालं, हे त्याला तितकंसं आठवत नसल्याचं त्याने नंतर सांगितलं.

पाण्यात उडी मारल्यानंतर नेमकं काय काय झालं, हे त्याला तितकंसं आठवत नसल्याचं त्याने नंतर सांगितलं.

  ब्रिटन, 26 ऑगस्ट : 'देव तारी, त्याला कोण मारी', अशी म्हण आहे. दैव बलवत्तर असलं, तर कितीही अवघड प्रसंगातून व्यक्तीची सुटका होऊ शकते. काही वर्षांपूर्वी याचा अनुभव ब्रिटनमधल्या (Britain) एका टीनएजर (Teenager) मुलाने घेतला. रॉरी मॅकसोर्ले (Ruairi McSorley) असं त्या मुलाचं नाव. बर्फासारख्या अत्यंत थंड अशा समुद्राच्या (Chilled Sea Water) पाण्यात तब्बल 12 तास राहावं लागूनही तो जिवंत राहिला. ही अत्यंत आश्चर्याची गोष्ट असून, तो आता Frostbit Boy म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. तो जिवंत राहण्याची अजिबातच शक्यता नव्हती. तरीही तो डॉल्फिन्ससोबत (Dolphins) तिथे जिवंत आढळला. रॉरीसोबत जे काही घडलं, त्याला दुर्घटना म्हणता येईल किंवा चमत्कारही म्हणता येईल; पण ती घटना रॉरीला प्रसिद्ध करून गेली. रॉरीने समुद्राच्या पाण्यात उडी मारल्यानंतर तो एका दीपगृहाच्या (Lighthouse) दिशेने पोहत पुढे निघाला होता. तो समुद्राच्या किती आतल्या भागात आलाय, याचा त्याला अंदाज नव्हता. लोकांना त्याचे कपडे दिसले, तेव्हा त्याला वाचवण्यासाठी होडी पाठवण्यात आली. समुद्राचं पाणी अत्यंत थंड होतं. 12 तासांपर्यंत त्याचा पत्ताच लागला नाही.

  एक सदस्यीय वार्ड पद्धतीमुळे पुणे पालिका निवडणुकीत कुणाला फायदा, कुणाला तोटा?

  डेरी (Derry) येथे राहणारा रॉरी हवामान खूप थंड असताना घराबाहेर पडला होता. त्या मोसमात लोक घरातच बसून राहणं पसंत करतात, अशा थंडीच्या कालावधीत रॉरीने नैर्ऋत्येकडच्या किनाऱ्यावरून पोहण्याचा निर्णय घेतला. पाण्यात उडी मारल्यानंतर तो दीपगृहाच्या दिशेने पोहू लागला. त्याचे कपडे किनाऱ्यावर होते. ते तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीला दिसले. त्यानंतर त्याचा शोध सुरू झाला. एका स्वयंसेवकाने लाइफबोटीत (Lifeboat) बसून दीपगृहाच्या दिशेने प्रवास करून अनेक तास रॉरीचा शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत शोध घेऊनही तो सापडला नाही. दरम्यान, कॅसलग्रेगरी किनाऱ्याजवळ काही डॉल्फिन्सचा समूह दिसला. लाइफबोटीवर बसलेल्या क्रूला या डॉल्फिन्सच्या समूहातच रॉरी असल्याचं दिसलं. त्याचं डोकं बाहेरच्या बाजूला दिसत होतं. इतक्या थंड पाण्यात 12 तासांहून अधिक काळ कोणी जिवंत राहू शकतं, यावर बचाव पथकातल्या कोणाचाच विश्वास नव्हता; मात्र डॉल्फिन्स माशांच्या त्या समूहानेच रॉरीचे प्राण वाचवले होते. ते त्याच्या सभोवती गराडा घालून पोहत होते.

  काळी जादू करत असल्याच्या संशयावरून शेजाऱ्याचा खून, बहीण आजारी पडल्याने केले वार

  रॉरीच्या आयुष्यात ही घटना 2015 साली घडली होती. त्याला समुद्रातून काढून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पाण्यात उडी मारल्यानंतर नेमकं काय काय झालं, हे त्याला तितकंसं आठवत नसल्याचं त्याने नंतर सांगितलं. डॉल्फिन्स त्याला पहिल्यांदा दिसले, तेव्हा त्याला ते शार्क मासे असल्यासारखं वाटलं होतं. शार्क (Shark) मासे असते, तर त्याचा प्राण नक्कीच गेला असता; मात्र डॉल्फिन्सनी त्याचे प्राण वाचवले.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या