मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भीषण अपघातानंतरही तो थांबला नाही; मृत सायकलस्वाराला कारच्या छतावर घेऊन सुसाट, VIDEO पाहून हादराल!

भीषण अपघातानंतरही तो थांबला नाही; मृत सायकलस्वाराला कारच्या छतावर घेऊन सुसाट, VIDEO पाहून हादराल!

भीषण म्हणजे कारचालकाने मृत सायकलस्वाराला गाडीच्या छतावर ठेवून तब्बल 10 किमीपर्यंत प्रवास केला.

भीषण म्हणजे कारचालकाने मृत सायकलस्वाराला गाडीच्या छतावर ठेवून तब्बल 10 किमीपर्यंत प्रवास केला.

भीषण म्हणजे कारचालकाने मृत सायकलस्वाराला गाडीच्या छतावर ठेवून तब्बल 10 किमीपर्यंत प्रवास केला.

  • Published by:  Meenal Gangurde
चंदीगड, 18 फेब्रुवारी : चंडीगडजवळील मोहालीमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे जलद गतीने येणाऱ्या एका कारने सायकलला जबरदस्त टक्कर दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की, सायकलवरील व्यक्ती उंचावर उडून सरळ कारच्या छतावर कोसळला. धक्कादायक म्हणजे सायकलला टक्कर मारल्यानंतरही कार चालकाने गाडी थांबवली नाही. उलट सायकल चालविणाऱ्या व्यक्तीला गाडीच्या छतावरच ठेवून घटनास्थळावरुन पळ काढला. सायकल चालविणाऱ्या व्यक्तीचा गाडीच्या छतावरच मृत्यू झाला. भीषण म्हणजे कारचालकाने मृत सायकलस्वाराला गाडीच्या छतावर ठेवून तब्बल 10 किमीपर्यंत प्रवास केला. मोहालीमधील एयरोसिटी सी ब्लॉकजवळील जीरकपूरच्या दिशेने जलद गतीने येणाऱ्या एका कारचालकाने सायकलवरुन येणाऱ्या व्यक्तीला इतक्या जोरात टक्कर मारली की, सायकलवरील व्यक्ती उडी मारुन गाडीच्या बोनेटवर पडला..त्यानंतर तो हवेत उडी घेऊन तो गाडीच्या छतावर पडला. इतकं झाल्यानंतरही कारचालकाने गाडी थांबवली नाही आणि तब्बल 10 किमीपर्यंत गाडीच्या छतावर मृतदेह घेऊन 10 किमीपर्यंत प्रवास केला. त्यानंतर कारचालक सन्नी एन्क्लेवच्या शोरुमसमोर मृतदेह फेकून फरार झाला. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने मृतदेह पाहिला व पोलिसांना तातडीने याची माहिती दिली. हे ही वाचा-RailTel IPO: कशी कमाई करेल रेल्वेचा हा IPO? गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून डिटेल्स डीएसपी रुपिंदरदीप कौर सोही घटनास्थळी पोहोचले आणि जवळपास लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करू लागले. यावेळी एका कारचालकाने मृतदेह येथे फेकल्याचे त्यांना दिसले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीची ओळख एयरोसिटी ब्लॉकमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय योगेंद्र मंडळ म्हणून झाली आहे. टक्कर मारणाऱ्या कारचालकाचे नाव निर्मल सिंह असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात आयपीसी कलम 279, 427 अ आणि 201 अंतर्गत दाखल केली असून वाहन ताब्यात घेण्यात आलं आहे.
First published:

Tags: Road accident

पुढील बातम्या