मुंबई 27 मे: उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचा अंश जास्त असणाऱ्या, थंडावा देणाऱ्या कलिंगड, खरबूज, द्राक्षे आदी फळांना मोठी मागणी असते. खरबूज हे फळ आरोग्याच्या दृष्टीनं अधिक उत्तम मानलं जातं. खरबूज (Musk Melon) डी-हायड्रेशन होण्यापासून वाचवते. तसंच विषाणू आणि जीवाणूपासून होणारा संसर्ग रोखण्यासही मदत करते. त्यामध्ये 95 टक्के पाणी आणि अनेक जीवनसत्वं, प्रथिनं असतात. त्यामुळं त्याला मागणी अधिक असते. आपल्या देशात एक खरबूज साधारण 60 ते 100 रुपयाला मिळतं. महागात महाग फार तर 500 रुपये होईल; पण जपानमध्ये दोन खरबूजांना मिळालेली किंमत ऐकून धक्काच बसेल. जपानमध्ये दोन खरबूज तब्बल 18 लाख रुपयांना विकली गेली आहेत.
आजतक डॉट इननं दिलेल्या वृत्तानुसार, जपानमध्ये खरबूज हे फळ युबारी (Yubari Melon) म्हणून ओळखलं जातं. जपानी लोकांमध्ये हे फळ अतिशय लोकप्रिय आहे. हे फळ घेणं हे तिथं प्रतिष्ठेचं मानलं जातं. यंदा जपानच्या उत्तर भागातील होक्काइडोच्या (Hokkaido) बाजारपेठेत झालेल्या लिलावात (Auction) दोन खरबूज 27 लाख येन (Yen) म्हणजेच 18 लाख 19 हजार 712 रुपयांमध्ये विकली गेली. गेल्या वर्षी तर याच्यापेक्षा जास्त किंमत मिळाली होती.
काय आहे विशेष?
या लिलावाच्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, एकसारख्या आकाराची ही दोन युबारी खरबूजं (Yubari Melons) उच्च गुणवत्ता आणि उत्तम चवीसाठी प्रसिद्ध आहेत. होक्काइडो भागात थंडीच्या हंगामात अतिशय कठीण परिस्थितीत याची लागवड केली जाते. मे ते ऑगस्ट महिन्यापर्यंत याचं उत्पादन घेतलं जातं. या फळांचा आकार, रंगरूप याबाबत इथले शेतकरी अतिशय सजग असतात. चांगली किंमत येण्यासाठी खरबूजाचा आकार एकदम गोलाकार आणि ते पूर्ण परिपक्व असणं महत्त्वाचं असतं.
ह्योगो प्रांतात आहे खरबुजाचे सुपर मार्केट : जपानमधील युबारी भागात होणाऱ्या खरबूजाच्या जातीला युबारी किंग (Yubari King) म्हणून ओळखले जाते. जपानमधील ह्योगो (Hyogo) इथं याचं सुपर मार्केट (Supermarket) आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा एका बेबी फूड उत्पादन करणाऱ्या व्यावसायिकानं ही इतकी प्रचंड किंमत देऊन ही दोन खरबूजं विकत घेतली आहेत. आता ऑनलाइन सोडतीमध्ये निवड झालेल्या लहान मुलं असलेल्या कुटुंबांना ही खरबूजं दान देण्यात येतील
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Photo viral, Shocking news