TikTok वर प्रसिद्धीसाठी मित्राला लटकवला फासावर, VIDEO शूट करताना...

TikTok वर प्रसिद्धीसाठी मित्राला लटकवला फासावर, VIDEO शूट करताना...

TikTok युजर्स प्रसिद्धीसाठी काहीतरी वेगळं आणि हटके करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा अपघातही होतात आणि असं व्हिडिओ करणं जीवावरही बेतण्याची शक्यता असते.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : टिकटॉक व्हिडिओसाठी युजर्स काय करतील हे सांगता येत नाही. चित्र विचित्र आणि हटके व्हिडिओ तयार कऱण्यासाठी कोणतंही पाऊल उचलण्यास तयार असतात. आता हरियाणातील जिंदमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हिडिओ तयार करण्यासाठी एका तरुणाला झाडाला फासावर लटकवण्याचा प्रकार समोर आला आहे. सुदैवानं झाडाला लटकल्यानंतर दोरी तुटल्यानं तरुणाचा जीव वाचला.

तरुणाच्या काकांनी याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिकारी कृष्ण कुमार यांनी सांगितलं की, हरियाणातील जिंद इथं टिकटॉक व्हिडिओ तयार करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी एका तरुणाच्या गळ्यात फास अडकवून झाडावर चढवण्यात आलं.

झाडावर चढलेल्या तरुणाच्या आयुष्याची दोरी बळकट होती. झाडावरून त्याने गळ्यात फास अडकलेल्या स्थितीत उडी मारली. त्यानंतर व्हिडिओ शूट करेपर्यंत तो तरुण दोरी तुटल्याने खाली पडला आणि जखमी झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखलं केलं. पोलिसांनी व्हिडिओ कऱणाऱ्या तरुणाविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नेहा कक्करच्या गाण्यानंतर चाहत्यांनी सुरू केलं रडायला, VIDEO VIRAL

पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सत्यवान यांनी सांगितले की, नेहरा गावात राहणाऱ्या रमन यांने त्यांचा पुतण्या विकासला 22 ऑक्टोबरला फोन करून शेतात बोलावलं. त्यानंतर टिकटॉक व्हिडिओसाठी विकासला फाशी घ्यायला सांगितलं. तेव्हा नकार देताच पुतण्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप सत्यवान यांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. विकास सध्या रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला श्वास घेण्यास त्रास होत आहे.

न्यू टायटॅनिक! प्रवाशांनी भरलेली धावती बस गेली खड्ड्यात, VIDEO VIRAL

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

First published: November 1, 2019, 11:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading