Home /News /viral /

टोल राहिला बाजूलाच ट्रकनं थेट टोल नाक्यालाच उडवलं, पाहा भीषण अपघाताचा CCTV VIDEO

टोल राहिला बाजूलाच ट्रकनं थेट टोल नाक्यालाच उडवलं, पाहा भीषण अपघाताचा CCTV VIDEO

काळ आला होता पण वेळ आली नव्हती. टोल वसूल करणारा कर्मचारी या घटनेत अगदी काही सेकंदाच्या अंतरानं बचावला आहे.

    फरीदाबाद, 04 जानेवारी : एकीकडे नव्या वर्षाचा उत्साह आणि कोरोनाच्या लशीला आपत्कालीन वापराची परवानगी मिळाल्यानं देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. दुसरीकडे स्मशानात छत कोसळून 25 जणांचा रविवारी मृत्यू झाला असताना आणखीन एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. टोलनाक्यावर टोल गोळा करणाऱ्या ऑफिसलाच एका ट्रकनं उडवलं आहे. अपघाताचा थरार टोल नाक्यावर असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फरीदाबादच्या सोहना रोडवर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेहमी सारखं ट्रक टोलवरून जात असताना अचानक हा अपघात झाला आहे. टोल वसून करणाऱ्या अधिकाऱ्याचा या दुर्घटनेत थोडक्यात जीव बचावला आहे. दैव बलवत्तर होतं म्हणून त्यानं मृत्यूला हुल दिली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना फरीदाबादमधील टोल नाक्यावर घडली आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. टोल वसूल करणारा कर्मचारी या घटनेत अगदी काही सेकंदाच्या अंतरानं बचावला आहे. या प्रकरणाची चौकशी होणार असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे पुढील कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या