हरयाणा, 18 फेब्रुवारी : भरधाव ट्रेन (train) आपल्या समोरून जरी धडधडत गेली तरी अंगावर काटा येतो, हृदयाची धडधड वाढतं. मग अशी ट्रेन आपल्या अंगावरून गेली तर काय होईल कल्पनाही करवत नाही. एका महिलेनं मात्र याचा अनुभव घेतला. ंसंपूर्ण ट्रेन तिच्या अंगावरून गेली पण तिला साधं खरचटलंही नाही. हा व्हिडीओ (video) सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होतो आहे.
हरयाणाच्या रोहतकमधील ट्रेनचा व्हिडीओ चर्चेत आहे. एका महिलेच्या अंगावरून धावती ट्रेन जाते आणि तेव्हा ती आपला जीव कसा वाचवते, ते या व्हिडीओतून दिसून येईल. एएनआयने हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
#WATCH | A woman saved her life by lying down on a railway track in Haryana's Rohtak after she got trapped beneath a moving train. The train was earlier on standby, awaiting a signal. She allegedly tried to cross it by going under when the train began to move suddenly (17.02) pic.twitter.com/kkuY1jtihm
— ANI (@ANI) February 18, 2021
व्हिडीओत पाहू शकता एक महिला ट्रेन ट्रॅकवर झोपली आहे आणि तिच्यावरून मालगाडी जाते आहे. तिच्या आजूबाजूला लोक आहेत. ते तिला तसंच राहा, अजिबात हलू नको असं ओरडून सांगत आहे. महिला अजिबात हालचाल न करता तशीच पडून राहते. ट्रेन ट्रॅकवरून जाईपर्यंत महिला अशीच पडून राहते. ट्रेन गेल्यानंतर पाहू शकता. महिलेजवळ काही माणसं जातात. ती महिला ट्रॅकवरून उठते आणि तिथून बाजूला होते.
हे वाचा - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तरुणाला उंटानं घडवली अद्दल; नेमकं काय घडलं पाहा VIDEO
रिपोर्टनुसार ही ट्रेन सिग्नलला उभी होती. तेव्हा महिला ट्रॅक क्रॉस करत होती. अचानक ट्रेन सुरू झाली आणि महिला ट्रॅकवरच होती. त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी ती ट्रॅकवर झोपली. सुदैवानं वेळीच महिलेनं असं डोकं लावल्यानं ती बचावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.