10 वर्षांच्या मुलानं मृत्यूला दिली हुलकाणी, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

10 वर्षांच्या मुलानं मृत्यूला दिली हुलकाणी, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

OMG! ट्रकची 10 वर्षांचा मुलाला धडक; साधं खरचटलंही नाही, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

  • Share this:

कुरुक्षेत्र, 22 ऑक्टोबर: काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं अनेकदा आपल्या भोवताली घडत असतं. 10 वर्षांच्या चिमुकल्यानं मृत्यूला हुल दिली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडालं आहे. हा चिमुकला मुलगा रस्ता ओलांडून पलिकडे जात असताना उभा असलेला ट्रक सुरू झाला आणि पुढे निघताच या मुलाला त्याने धडक दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून काळजचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना हरियाणातील कुरुक्षेत्र परिसरात घडली आहे. एवढ्या मोठ्या संकटातून मुलगा वाचून घरी आला ही नवरात्रात देवीची कृपा आहे असं भावुक झालेली आई आणि या मुलाच्या आजोबांनी भावना व्यक्त केली आहे. या चिमुकल्यानं मृत्यूला हुलकावणी दिल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं आहे. या ट्रकनं धडक दिली मात्र या मुलाला साधं खरचटलं देखील नाही. हा मुलगा सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे.

हे वाचा-VIDEO:घरी पोहोचण्याआधी प्रवाशांचा मृत्यूची सामना, धावत्या बसमध्ये पाहा काय झाल?

दहा वर्षांचा आर्यन आपल्या मित्रासह सायकलवर जात होता. दोघेही मानसरोवर कोल्ड स्टोअर समोरून सायकल ठेवून पायी चालत निघाले. त्याचवेळी मागे उभ्या असलेल्या ट्रकनं धडक दिली. शुभम आर्यनच्या मित्रानं रस्त्या ओलांडला मात्र आर्यनला धडक बसली आणि तो ट्रकखाली गेला. नशीब बलवत्तर आणि वेळ चांगली म्हणून आर्यन चाकाखाली नाही तर दोन चाकांच्या मधल्या भागात अडकला होता आणि त्याचा जीव वाचला.

ट्रकखाली गेल्यानंतर या चिमुकल्यानं ओरडण्यास सुरुवात केली तेव्हा ट्रक चालकानं गाडी थांबवली या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. युझर्सही देवीच्या कृपेनं वाचल्याच्या कमेंट्स या व्हिडीओवर करत आहे. नवरात्र उत्सवाची धूम सुरू असताना या चिमुकल्यानं मृत्यूला हुलकावणी दिली आणि सुखरुप आपल्या घरी पोहोचल्याची माहिती मिळाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 22, 2020, 11:26 AM IST

ताज्या बातम्या