VIRAL VIDEO : रुमाली रोटी खाणाऱ्यांनो कधी 'चादर रोटी' पाहिली आहे का?

VIRAL VIDEO : रुमाली रोटी खाणाऱ्यांनो कधी 'चादर रोटी' पाहिली आहे का?

चादर रोटीच्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घातला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : खाण्याची प्रचंड आवड असणाऱ्यांना रुमाली रोटी हा प्रकार तर माहित असेलच. उत्तर भारतात घरात दररोज रुमाली रोटी केली जाते. पण तुम्ही कधी ‘चादर रोटी’बाबत ऐकले नसेल. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क चादर रोटी तयार कशी केली जाते, हे दाखवण्यात आले आहे. दिग्गज व्यवसायिक हर्ष गोयंका यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

चादर रोटीचा हा व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत 50 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. दरम्यान काहींनी ही चादर रोटी वगैरे नसुन पाकिस्तानी रोटी असल्याचे मत व्यक्त केले आहे.

हा व्हिडीओ पाहून ट्विटरवर काही युझरनी मजेदार कमेंट केले आहेत. यात एकानं, “ही रोटी एवढी मोठी आहे तर त्यासाठी प्लेट किती मोठी लागेल”, असे तर एकानं ही रोटी पाहून पोटं भरलं अशा कमेंट केल्या आहेत.

दरम्यान या चादर रोटीच्या व्हिडीओला विविध नावे देण्यात आली आहे. या रोटीमध्ये संपूर्ण कुटुंबाचे पोट भरते. तर, एका युझरनं ही रोटी साऊदीमध्ये जास्त बनवली जाते, अशी माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 30, 2019 02:44 PM IST

ताज्या बातम्या