नागपूर पोलिसांनी विचारलं 'आज क्या प्रोग्राम है', कमेंट वाचून हसू आवरणार नाही!

रात्रभर ओल्या पार्टी करणाऱ्यांच्या बेतात असलेल्या तळीरामांच्या प्लॅनिंगवर पाणी फेरले आहे. त्यातच नागपूर पोलिसांनी और आज क्या प्रोग्रॉम है' असं विचारून...

रात्रभर ओल्या पार्टी करणाऱ्यांच्या बेतात असलेल्या तळीरामांच्या प्लॅनिंगवर पाणी फेरले आहे. त्यातच नागपूर पोलिसांनी और आज क्या प्रोग्रॉम है' असं विचारून...

  • Share this:
    मुंबई, 31 डिसेंबर :  कोरोनाच्या (Corona) काळोखाने बुडालेल्या 2020 या वर्षाला आता अवघ्या काही तासांत निरोप देण्यात येणार आहे. एव्हाना जगाच्या पाठीवर नववर्षाचे जल्लोषात (new year's eve) स्वागत सुद्धा झाले आहे. सर्वत्र एकावर एक पॅग रिचवले जात आहे. तर कुठे पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. अशातच नागपूर पोलिसांनी (Nagpur police) 'और आज क्या प्रोग्राम है' असं विचारून एकच कल्लोळ केला आहे. कोरोनाचा नवीन विषाणू सापडल्यामुळे राज्यभरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यामुळे रात्रभर ओल्या पार्टी करणाऱ्यांच्या बेतात असलेल्या तळीरामांच्या प्लॅनिंगवर पाणी फेरले आहे. त्यातच नागपूर पोलिसांनी और आज क्या प्रोग्रॉम है' असं विचारून चांगलाच टोला लगावला आहे. आता पोलिसांनी असा काही सवाल विचारल्यावर ट्वीटरकरांनी एकापेक्षा एक भन्नाट उत्तरं दिली. 'एक दिवस तरी सोडा' असं म्हणत रोहित शर्माच्या फोटोवर याला काय अर्थय राव?' असं विचारून एकाने पोलिसांपुढे लोटांगणच घातले आहे. नागपूर पोलिसांनीही त्याच भाषेत उत्तर देत धोनीचा फोटो रिट्वीट केला आहे. यात धोनी टॉस जिंकल्यावर नेहमीप्रमाणे 'डेफिन्टेली नॉट' असं म्हणतो, तोच फोटो पोलिसांनी रिट्वीट केला आहे. तर एका जणाने 'बासुंदी आहे सर', असं खुमासदार उत्तर दिले आहे. नागपूर पोेलिसांच्या या ट्वीटवर आलेले काही मजेदार ट्वीट... ---------------------------------------------------- ---------------------------------------------------- ---------------------------------------------------- ----------------------
    Published by:sachin Salve
    First published: