Home /News /viral /

पायात बळ नसलं तरी जिद्दीमुळे स्वावलंबी; भलीमोठी घागर घेऊन दिव्यांग महिला कशी भरते पाणी पाहा VIDEO

पायात बळ नसलं तरी जिद्दीमुळे स्वावलंबी; भलीमोठी घागर घेऊन दिव्यांग महिला कशी भरते पाणी पाहा VIDEO

देवाने सर्व दु:ख आपल्याच पदरात टाकले, असं वाटणाऱ्या प्रत्येकाने दिव्यांग महिलेचा हा व्हिडीओ नक्की पाहावा.

    मुंबई, 25 ऑगस्ट :  आपल्यापैकी कुणीच असं नसावं की जो आयुष्यात रडला नसावा. आपल्याला जीवनात अनेक तक्रारी असतात. छोट्या छोट्या गोष्टींचाही आपण खूप मोठा बाऊ करतो. माझ्याकडे हे का नाही, मी तसा का नाही, मला हे जमत नाही, असं सतत रडगाणं आपलं सुरूच असतं. देवाने सर्व दु:ख आपल्याच पदरात घातली, असं वाटणाऱ्या प्रत्येकाने दिव्यांग महिलेचा (handicapped woman) हा व्हिडीओ नक्की पाहावा. आयपीएस अधिकारी पंकज नैन यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये एक महिला डोक्यावर भली मोठी घागर घेऊन पाणी भरताना दिसते आहे. आता तुम्ही म्हणाल यात नवल काय? तर ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावरच समजेल. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाला त्यात काही विशेष दिसणार नाही. ही महिला बसलेली आहे. आपल्या पाण्याच्या घागरी धुते त्यात पाणी भरते. आता इथून पुढे पाहा ही महिला जेव्हा आपल्या डोक्यावर घागर घेते आणि चालायला लागते. तेव्हा ती बसूनच चालते, आपल्या गुडघ्यांवर ती चालते. हे वाचा - मुलं अधिकारी पदावर आणि माय रस्त्यावर, IAS अधिकाऱ्यानं शेअर केला भावुक PHOTO ही महिला पायाने दिव्यांग आहे. तिला उभं राहून चालता येत नाही. पायाने दिव्यांग असली तरी ती स्वावलंबी आहे. आपल्या कामांसाठी कुणावर अवलंबून नाही. तिच्या घराच्या बाहेर काही अंतरावर पाण्याचा नळ आहे. तिथून ही महिला या भल्यामोठ्या घागरी भरून आपल्या डोक्यावरून घरात नेते. विशेष म्हणजे नळ ते घरापर्यंत ती पाण्याचा एकही थेंब सांडवत नाही. या महिलेचं सर्वांनी कौतुक केलं आहे. तिच्या जिद्दीला सलाम केला आहे. ही महिला म्हणजे एका प्रेरणा असल्याचं म्हटलं आहे. हे वाचा - 'या' VIDEO मध्ये चिमुकल्याची कमाल तर पाहा, तुम्हीही म्हणाल... व्वा छोटे उस्ताद! अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरूनही जीवनाबाबत तुमच्या तक्रारी असतील तर हा व्हिडीओ पाहून त्या तक्रारीही तुम्हाला यापुढे काहीच वाटणार नाही. दिव्यांग महिलेचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. तुम्ही सकारात्मक नजरेने जीवनाकडे पाहू लागेल आणि सतत रडत राहण्यापेक्षा असलेल्या परिस्थितीवर कशी मात करावी किंवा या परिस्थिती जुळवून घेत कसं जगावं हे शिकवणारा हा व्हिडीओ आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Social media viral, Viral videos

    पुढील बातम्या