Home /News /viral /

VIDEO: विनाकारण वाघाच्या पिंजऱ्यात घातला हात; पुढे घडलं असं काही की उडाला थरकाप

VIDEO: विनाकारण वाघाच्या पिंजऱ्यात घातला हात; पुढे घडलं असं काही की उडाला थरकाप

वाघासोबत पंगा घेणं या व्यक्तीला चांगलंच महागात पडतं. काही क्षणातच त्याला कर्माचं फळ मिळतं. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

  नवी दिल्ली 06 जून : आपण सर्वांनी प्राणीसंग्रहालयांमध्ये पिंजऱ्याच्या आत बंद असलेले वाघ, सिंह आणि बिबट्या असे हिंस्त्र प्राणी पाहिले असतील. मात्र हेच प्राणी जर अचानक समोर आले तर कोणाचीही अवस्था खराब होईल. मात्र, हे प्राणी पिंजऱ्यात बंद असताना काही लोक त्यांच्याजवळ जात त्यांच्यासोबत मस्ती करण्याचा आणि या प्राण्यांची खोड काढण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Tiger Shocking Video) होत आहे. यात एक व्यक्ती प्राणीसंग्रहालयात वाघ बघताच त्याला त्रास देण्यास सुरुवात करतो. Fact Check : वॉटर पार्कमध्ये स्लायडिंग करणाऱ्या महिलेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू? त्यावेळी नेमकं काय घडलं? वाघासोबत पंगा घेणं या व्यक्तीला चांगलंच महागात पडतं. काही क्षणातच त्याला कर्माचं फळ मिळतं. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की प्राणीसंग्रहालयात गेलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यात काहीतरी येतं आणि वाघाला बंद पिंजऱ्यात पाहून तो त्याच्याजवळ पोहोचतो. यानंतर हा व्यक्ती पिंजऱ्याच्या आत आपलं बोट टाकतो आणि वाघाची खोड करण्याचा प्रयत्न करू लागतो.
  View this post on Instagram

  A post shared by memes | comedy (@ghantaa)

  आपल्या बोटांनी तो कधी वाघाच्या पाठीवर मारताना दिसतो, तर कधी हाताने त्याच्या मानेवर मारताना दिसतो. तुम्ही पाहू शकता की काहीवेळातच त्याची हिंमत इतकी वाढते की तो वाघाचे कानही ओढू लागतो. हा व्यक्ती हे कारनामे करत असतानाच अचानक त्याचा हात पिंजऱ्यात अडकतो. यानंतर मात्र हा तरुण चांगलाच घाबरतो. सोफ्यावर बसून करत होता सिंहासोबत मस्ती; भडकलेल्या जंगलाच्या राजाने काय केलं पाहा, Shocking Video हा व्यक्ती पूर्ण ताकद लावून आपला हात बाहेर खेचण्याची प्रयत्न करत राहातो. कारण पिंजऱ्यात हात अडकल्यामुळे आता वाघ आपला हात कधीही जबड्यात पकडू शकतो, याची कल्पना या व्यक्तीला येते. अखेर आपला हात इथून सुरक्षित बाहेर काढण्यात तो यशस्वी ठरतो. सुदैवाने यादरम्यान वाघाचं लक्ष या व्यक्तीकडे गेलं नाही. अन्यथा वाघाने या व्यक्तीच्या हातावर हल्ला केला असता. हा व्हिडिओ ghantaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking video viral, Tiger attack

  पुढील बातम्या