मुंबई, 2 फेब्रुवारी- देशभरात अनेक तीर्थक्षेत्रं आहेत. या प्रत्येक तीर्थक्षेत्राचं आध्यात्मिकदृष्ट्या खास असं महत्त्व आहे. वर्षातल्या विशिष्ट तिथींना भाविक देवदर्शनासाठी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गर्दी करत असतात. जीवनात सुख-समृद्धी, यश मिळावं, सर्व अडचणी-समस्या दूर व्हाव्यात हा यामागचा उद्देश असतो. जागृत तीर्थस्थळी तर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. उत्तराखंडमधल्या हल्दवानी इथल्या गोलजू महाराजांचं मंदिर अत्यंत खास मानलं जातं. जीवनात न्याय मिळावा, या उद्देशाने अनेक जण तिथे दर्शनासाठी आणि मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी येतात. या ठिकाणी भाविक स्टँप पेपरवर आपली इच्छा लिहून ती मंदिरात अर्पण करतात. अशी इच्छा पूर्ण होऊन न्याय मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे गोलजू महाराज न्यायदेवता म्हणून ओळखले जातात. या मंदिराची काही खास वैशिष्ट्यं जाणून घेऊ या.
उत्तराखंडमधल्या हल्दवानीच्या हिरानगरमध्ये गोलजू देवतेचं प्रसिद्ध मंदिर आहे. गोलजू महाराज हे न्यायदेवता मानले जातात. जेव्हा कुठेच न्याय मिळत नसेल तेव्हा इथे सुनावणी घेतली जाते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटी अनेक भाविक मंदिरात येऊन आपली मागणी मांडतात. या मंदिरात जो आपली भाविक आपली मागणी मांडतो, त्याची इच्छा ही देवता पूर्ण करते,असं मानलं जातं. हल्दवानी इथल्या 25 वर्षांहून अधिक जुन्या मंदिरात न्यायालयाच्या धर्तीवर भाविक नियमितपणे न्याय मागण्यासाठी येतात. तिथे दर मंगळवारी सुंदरकांडाचं पठण केलं जातं.
(हे वाचा:रतन टाटांच्या भावानेही जिंकली मनं, 2 BHK फ्लॅटमध्ये वास्तव्य; मोबाइलही वापरत नाहीत )
गोलजू मंदिराचे पुजारी निर्मल भट्ट यांनी सांगितलं, की `हल्द्वानीमध्ये गोलजू यांचं असं एक तीर्थक्षेत्र आहे, जिथे इतर धर्मांचे लोकही समृद्धीची कामना करण्यासाठी येतात. भक्त मंदिरात एक चिठ्ठी लिहून आपली इच्छा मांडतात आणि जो मनापासून भगवान गोलजूंकडे आपली इच्छा व्यक्त करतो त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होते. ज्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, ते एक तर मंदिरात घंटा अर्पण करतात किंवा भंडारा, प्रसाद वाटप, पूजाविधी आदी करतात.`
विवाहासाठी हे मंदिर आहे प्रसिद्ध
पुजारी भट्ट यांनी सांगितलं, `अनेक जण सरकारी स्टँप पेपरवर आपली इच्छा लिहून मंदिरात देतात. गोलजू हे न्यायदेवता असल्याने ते भाविकांच्या मागणीला योग्य न्याय देतात. चुका करणाऱ्याला प्रसंगी शिक्षाही करतात. गोलू देवता अनेकदा पर्वतावर आयोजित केलेल्या जागर कार्यक्रमात अवतरतात, असं मानलं जातं. हल्दवानीच्या या मंदिरात अनेक जण विवाहासाठीदेखील येतात. या मंदिरात लग्न केल्याने नवविवाहित जोडप्याचं जीवन सुखमय होतं, असं मानलं जातं.`
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Viral news