• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • केक कापताना मेणबत्ती विझवत होती प्रसिद्ध अभिनेत्री; अचानक केसांनी घेतला पेट अन्..., पाहा Shocking Video

केक कापताना मेणबत्ती विझवत होती प्रसिद्ध अभिनेत्री; अचानक केसांनी घेतला पेट अन्..., पाहा Shocking Video

सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक अजब व्हिडिओ व्हायरल (Weird Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल, की केक कापताना मेणबत्तीपासून दूर राहाणं गरजेचं का आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 23 सप्टेंबर : कोणत्याही व्यक्तीची बर्थडे पार्टी (Birthday Party) तेव्हापर्यंत अपूर्णच असते जोपर्यंत केक कापला जात नाही. यातही जेव्हा मेणबत्ती विझवून केक (Birthday Celebration) कापला जातो, तेव्हा बर्थडे बॉय किंवा गर्लच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा असतो. त्यामुळे, हे सुंदर क्षण माणूस कॅमेऱ्यात कैद करत असतो. मात्र, सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक अजब व्हिडिओ व्हायरल (Weird Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल, की केक कापताना मेणबत्तीपासून दूर राहाणं गरजेचं का आहे. काय हे प्रेम! एकमेकींना कडकडून मिठी मारताना दिसल्या 2 मांजरी; पाहा Cute Video अमेरिकन अभिनेत्री निकोल रिचीनं (Nicole Richie Instagram Video) आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. काहीच वेळात हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. बर्थडे सेलिब्रेशनदरम्यान निकोल आपल्या बर्थडे केकवर लावलेल्या मेणबत्ती विझवताना दिसत आहे. मात्र, एका छोट्याशा चुकीमुळे मोठी दुर्घटना घडते. निकोलनं आपले केस मोकळे सोडले होते. जेव्हा ती मेणबत्ती विझवण्यासाठी पुढे सरकली तेव्हा तिच्या केसांना आग लागली.
  या व्हिडिओमध्ये दिसतं, की एका सेकंदाच्या आतच तिच्या केसांला भयंकर आग लागली. हा व्हिडिओ जरीही पूर्ण नसला तरीही यातून इतकं नक्कीच कळतं की थोडासा हलगर्जीपणाही मोठ्या दुर्घटनेत बदलू शकतो. निकोलनं जेव्हा आपले केस जळताना पाहिले तेव्हा ती जोरजोरात ओरडू लागली. तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ 28 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. मुलावर भिंत कोसळताना दिसताच ढाल बनून उभा राहिली आई; हृदय पिळवटून टाकणारा VIDEO सोशल मीडियावर यूजर्सनं यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लिहिलं, बर्थडे सेलिब्रेशन अशाच पद्धतीनं व्हायला हवं. खरंच आग लागली. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, पार्टीच्या नादात हलगर्जीपणा तरी करू नका. याशिवाय इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: