मराठी बातम्या /बातम्या /Viral /

काळीज धस्स होईल, अशी घटना घडली की 5 वर्षांच्या मुलीचे केस उपटले चामडीसह

काळीज धस्स होईल, अशी घटना घडली की 5 वर्षांच्या मुलीचे केस उपटले चामडीसह

महिलेने त्यात अडकलेले केस काढण्याचा प्रयत्न करेपर्यंत तिच्या डोक्याच्या केसांसह चामडीचाही काही भाग अक्षरशः उपटून बाहेर आला.

महिलेने त्यात अडकलेले केस काढण्याचा प्रयत्न करेपर्यंत तिच्या डोक्याच्या केसांसह चामडीचाही काही भाग अक्षरशः उपटून बाहेर आला.

महिलेने त्यात अडकलेले केस काढण्याचा प्रयत्न करेपर्यंत तिच्या डोक्याच्या केसांसह चामडीचाही काही भाग अक्षरशः उपटून बाहेर आला.

लंडन, 29 ऑक्टोबर: दुर्घटना कधीही, कोणाच्या बाबतीतही घडू शकतात. अनेकदा नकळत अशा दुर्घटना (Mishap) घडतात, की ज्यांचे परिणाम खूपच वाईट असतात. अशीच एक घटना स्कॉटलंडमध्ये (Scotland) अलीकडेच घडली. काम करत असलेल्या आईजवळ गेलेल्या पाच वर्षांच्या एका मुलीच्या बाबतीत आयुष्यभर विसरता येणार नाही अशी घटना घडली. त्या मुलीची आई स्वयंपाकघरात (Kitchen Mishap) केक तयार करत होती. त्यासाठीचं मिश्रण ती इलेक्ट्रिक बीटरने फेटत होती. तेवढ्यात तिथे आलेल्या तिच्या लहान मुलीचे केस त्यात अडकले. त्या महिलेने त्यात अडकलेले केस काढण्याचा प्रयत्न करेपर्यंत तिच्या डोक्याच्या केसांसह चामडीचाही काही भाग अक्षरशः उपटून बाहेर आला. नुसतं ऐकूनही अंगावर काटा येईल, अशी ही घटना.

'डेली रेकॉर्डस्'ने दिलेल्या वृत्तानुसार, ही मुलगी स्कॉटलंडमध्ये आयरशायर इथे राहते. ही घटना तिच्या आजीच्या घरी घडली. तिथे तिची आई केकचं मिश्रण तयार करत होती. ती काय करतेय याची उत्सुकता मुलीला वाटत होती. म्हणून तिने तिथे वाकून पाहिलं. तेवढ्यात तिचे केस त्या इलेक्ट्रिक बीटरमध्ये अडकले. त्यामुळे तिच्या डोक्याच्या पुढच्या एका मोठ्या भागाचे केस अक्षरशः चामडीसह उपटून आले. नेमकं काय घडतंय हे पूर्णपणे कळायच्या आत, अवघ्या काही सेकंदांमध्ये ही घटना घडली. त्या मुलीच्या आजीने तातडीने त्या बीटरचं बटण बंद केलं; मात्र तोपर्यंत दुर्घटना घडून गेली होती.

हेही वाचा-  अजबच आहे! शरीरावर एक Magic number लिहिल्याने छुमंतर होते कोणतीही समस्या; तरुणाचा विचित्र उपाय

 त्या मुलीच्या आईला या घटनेमुळे मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे ती सारखी रडते आहे. 'मी लहान होते तेव्हा माझ्या आईसोबत मीही केक तयार करण्याचा आनंद लुटायचे. त्यात खूप मजा यायची; पण माझ्या मुलीच्या बाबतीत अशी काही घटना घडेल, असा विचारही केला नव्हता,' असं तिने सांगितलं. आपल्या मुलीला आपल्या डोळ्यांसमोर रक्ताने माखलेल्या स्थितीत किंचाळताना पाहून त्या माउलीचं काळीज थरथरलं. त्या मुलीला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे डॉक्टर्सनी तिच्यावर तातडीने सर्जरी केली. मुलीच्या आजीने तातडीने मिक्सरचं बटण बंद केलं नसतं, तर या दुर्घटनेची तीव्रता आणखी वाढली असती, असं सांगून डॉक्टर्सनी आजीचं कौतुक केलं.

हेही वाचा- 'या'अमेरिकेन पठ्ठ्यानं सलमान खानच्या गाण्यावर केला जबरदस्त डान्स, पाहा Video

ती मुलगीही वयाने लहान असली, तरी धीराची आहे. एवढी मोठी दुर्घटना आपल्या बाबतीत घडूनही तिने समजूतदारपणे परिस्थिती हाताळली. वेदनांनी ती तडफडत होती, तरीही तिने डॉक्टर्स करत असलेल्या उपचारांदरम्यान चांगलं सहकार्य केलं. आता त्या मुलीची परिस्थिती बरीच सुधारते आहे. तिच्या डोक्याच्या एका भागाचे केस गेले असून, तिथे ट्रान्स्प्लांट (Hair Transplant) करण्याचं नियोजन आहे. आता तिच्या जखमा भरत आहेत. काही कालावधीनंतर जेव्हा तिच्या जखमा भरतील, तेव्हा तिला केशारोपण केलं जाणार आहे.

First published:

Tags: Accident, Viral news