ग्वालीयर : भांडणं आणि ड्रामा म्हटला की माणसं वेळात वेळ काढून ते पाहात बसतात. अगदीच वेळ कमी असला तरी लोक ढुंकावून पाहायला जातात आणि आजूबाजूच्या लोकांना काय झालं असं विचारत माहिती घेतात. जवळजवळ प्रत्येक भारतीयांना हे पाहायला आवडतं. सध्या यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. जो लोकांनी लाखो वेळा पाहिला आहे.
या व्हिडीओमध्ये एक २५ वर्षीय तरुणीने रस्त्याच्या मधोमध ड्रामा केला आहे. तिचा हा गोंधळ छोटा-मोठा नव्हता, तर तिने अक्षरश: लोकांच्या नाकी नऊ आणले.
वानराने लावले माकडाच्या कानशिलात, पुढे जे घडलं ते... पाहा Video
ही तरुणी रस्त्यात जोरजोराड ओरडताना दिसत आहे. तिने रस्त्यावरील पोलिसांचे बॅरिगेट्स पाडले. एवढंच नाही तर एका व्यक्तीकडून त्याची दुचाकी हिस्कावून घेतली आणि त्यावर बसली. एवढंच कमी होतं की काय तर पुढच्या क्षणी ही तरुणी एका कारच्या पुढच्या काचेवर बसलेली दिसत आहे.
ती वाहन चालकाला गाडी चालवू देत नाही आहे. पुढे काही महिलांनी या तरुणीला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. पण ती तरुणी काही ऐकायला तयार नव्हती. तिने महिलांनाही त्रास दिला, शिवाय कारच्या ड्रायव्हरसमोर तिने दादागिरी केली आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला.
या एका तरुणीमुळे संपूर्ण रस्त्यावर ट्राफीक जाम झालं होतं. जो तो या तरुणीचं काय चाललंय या सगळ्याकडे पाहातच राहिला होता.
अखेर त्रासलेल्या लोकांनीपोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणीला पोलीस ठाण्यात नेले. प्रेमात फसवणूक झाल्याचे ती लोकांना सांगत होती असं तेथील एका व्यक्तीने सांगितले. तर मध्येच ती सरकार विरोधात देखील काहीतरी बोलत असल्याचे सांगण्यात आले आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की ती तरुणी मानसिक रुग्ण आहे.
ग्वालियर युवती का हाइवोल्टेज ड्रामा. फूल बाग चौराहा पर एक युवती ने किया हंगामा युवती ने एक घंटे तक हंगामा कर उत्पात मचाया युवती ने एक कार सवार के साथ मारपीट की बुजुर्ग की एक्टिवा छुड़ाकर खुद बैठकर चलाने लगी युवती ने सड़क पर लगे पुलिस के बैरिकेट्स उठा कर फेंक दिए pic.twitter.com/pue5cJdnaQ
— Sushil Kaushik (@SushilKaushikMP) March 27, 2023
आता ही तरुणी असं का करत होती यामागचं खरं कारण कळू शकलेलं नाही, पण तिने जो काही ड्रामा क्रिएट केला, तो अनेकांनी आपल्या कॅमेरात टीपला आणि सोशल मीडियावर शेअर केला.
मिळालेल्या माहितीनुसार, 27 मार्च रोजी दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास ग्वालीयर येथे ही घटना घडली. फुलबागेतून बाहेर पडणाऱ्या लोकांना तरुणीने वेठीस धरले. पोलीस या सगळ्या प्रकाराचा तपास घेत आहेत, आता पुढील तपास सुरु आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Shocking, Social media, Top trending, Videos viral, Viral