Home /News /viral /

रस्त्याशेजारी बसलेल्या गरीबांना नोटांचे बंडल वाटते ही व्यक्ती, पण काय आहे कारण?

रस्त्याशेजारी बसलेल्या गरीबांना नोटांचे बंडल वाटते ही व्यक्ती, पण काय आहे कारण?

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    नवी दिल्ली, 19 जानेवारी : सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral On Social Media) होत आहे, ज्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. रस्त्यावरुन चालताना एखादी गरीब वा गरजू व्यक्तीला पाहिलं तर तिला काही पैसे देऊन लोक निघून जातात. काहीजण खाण्याचे पदार्थही देतात. मात्र अशा बेघर व्यक्तीला कोणी नोटांचा बंडल दिल्याचं पाहिलं आहे का? तर अशीच एक घटना समोर आली आहे. याबद्दल कदाचित तुम्ही कधीच ऐकलंही नसेल. बेघर लोकांच्या मदतीसाठी पुढे आली ही व्यक्ती... पीटर बॉन्ड नावाच्या या व्यक्तीने बेघरांना मदत करण्यासाठी अद्भूत असं काम केलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Social Media) या व्यक्तीने बेघर लोकांना नोटांचा बंडल देताना पाहून अनेकजण हैराण झाले. त्याने हा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केला होता. जो 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. त्याने आपल्या अकाऊंटवरुन असे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यात तो बेघर लोकांची मदत करीत असल्याचं दिसत आहे. हे ही वाचा-झोपेत बडबडू लागली पत्नी; असं काही म्हणाली की, पतीने थेट केला पोलिसांना फोन! सोशल मीडियावर काही लोकांनी दिलं असं रिएक्शन अनेकांनी पीटर बॉन्डच्या कामाचं कौतुक केलं. तर अनेकांनी तो वाटत असलेल्या पैशांवर सवाल उपस्थित केला. तर एकाने सांगितलं की, खरंच याला मदत करायची असेल तर त्याने टिकटॉकवर व्हिडीओ का शेअर केला. एका युजरने सांगितलं की, व्हिडीओमधून पैसे मिळाल्यानंतर तो बेघर लोकांची मदत करीत असेल. यापूर्वीदेखील बेघरांच्या मदतीसाठी पुढे आली आहे व्यक्ती... काही दिवसांपूर्वी एका क्लिपमध्ये ही व्यक्ती आपला स्वेटपँट काढून एका बेघर व्यक्तीला देते. बेघर व्यक्ती डोनटच्या दुकानाबाहेर थंडीमध्ये हुडहुडत होता.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Viral video on social media, Viral video.

    पुढील बातम्या