'कैसे बचाओगे प्रीति को...', ट्रॅफिक पोलिसांनी शाहिदला ट्रोल करत तो सिन केला ट्वीट

'कैसे बचाओगे प्रीति को...', ट्रॅफिक पोलिसांनी शाहिदला ट्रोल करत तो सिन केला ट्वीट

वाहतुकीचे नियम तरुणांना समजवण्यासाठी ट्रॅफिक पोलीस नवनवीन युक्त्या काढत असतात. यातच ट्विटरवर ट्रॅफिक पोलिसांनी शेअर केलेले मिम्स तुफान व्हायरल होत असतात.

  • Share this:

गुरुग्राम, 07 फेब्रुवारी : वाहतुकीचे नियम तरुणांना समजवण्यासाठी ट्रॅफिक पोलीस नवनवीन युक्त्या काढत असतात. यातच ट्विटरवर ट्रॅफिक पोलिसांनी शेअर केलेले मिम्स तुफान व्हायरल होत असतात. गुरुग्राम ट्रॅफिक पोलिसांनी हेल्मेटचा फायदा समजवण्यासाठी चक्क शाहिद कपूरच्या कबीर सिंह सिनेमाचे एक मिम शेअर केले.

वाहतूक पोलिसांनी विनोद करून लोकांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल विचार करण्यास सांगितले. मीम पोस्ट करत असताना पोलिसांनी लिहिले की, "तुम्ही स्वतःला वाचवाल तेव्हाच तुम्ही प्रितीला वाचवाल". या मिममध्ये कबीर सिंह (शाहिद कपूर) होळीच्या दिवशी प्रीती (कियारा अडवाणी) वाचवण्यासाठी दुचाकीवरून बाहेर पडतो. त्यावेळी हेल्मेटशिवाय तो गाडी चालवतो, असे दाखवण्यात आले आहे.

वाचा-नळातून पाणी नाही आली दारू, लोकांना सुचेना काय करावं, वाचा नेमकं काय घडलं?

गुरुग्राम ट्रॅफिक पोलिसांनी गेल्या महिन्यात वाहन चालकांना हेल्मेटचे वितरण केले. हेल्मेट घालण्याचे महत्त्व पटवून देणे.

वाचा-नवरदेवाच्या तोंडात ठेवली नोट, घोड्यावर चढून तरुणाचा भयंकर नागिन डान्स, VIDEO

वाचा-नवरदेवाच्या तोंडात ठेवली नोट, घोड्यावर चढून तरुणाचा भयंकर नागिन डान्स, VIDEO

वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करीत एसीपी अखिल कुमार यांनी हेल्मेट नसलेल्या अनेक दुचाकीस्वारांना हेल्मेट सादर केले व संदेश पाठविण्यास प्रोत्साहित केले. पोलिसांनी केवळ 200 हेल्मेटचे वितरण केले नाही तर 500 पेन आणि फुले लोकांना दिली.

वाचा-अजब गोलमाल! ज्या हॉटेलच्या लॉबीमध्ये बसला त्यालाच 165 कोटींना विकण्याचा रचला कट

गेल्या वर्षी जाहीर केलेल्या सरकारी अहवालानुसार 2018 मध्ये देशातील रस्ते अपघातात दीड लाखाहून अधिक लोकांचे प्राण गमावले. जगातील रस्ते आकडेवारीत रस्ते अपघातातील मृत्यूंपैकी 199 देशांमध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे.

First published: February 7, 2020, 9:30 AM IST

ताज्या बातम्या