अरे देवा! बाजारात आलाय ‘गुलाबजाम-पाव’, PHOTO VIRAL

अरे देवा! बाजारात आलाय ‘गुलाबजाम-पाव’, PHOTO VIRAL

गुलाब जामुन आणि वडापाव आवडणाऱ्या खवय्यांसाठी आला एक हटके पदार्थ.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 डिसेंबर: गुलाब जामुन ही बर्‍याच लोकांचे आवडते मिष्टान्नं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र आणि मुंबईतील सर्वात प्रसिध्द पदार्थ म्हणजे वडा पाव. पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की गुलाब जामुन आणि वडापाव असं एकत्र खाल्लं जातय तर? बरेच लोक या अजब पदार्थावर नाक मुरडतील मात्र एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अलीकडेच ट्विटरवर कुणीतरी ‘गुलाबजाम पाव’ चे चित्र शेअर केले आहे. हे चित्र सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये गुलाबजाम पावासोबत खाताना दिसत आहे. हा फोटो ट्विटरवर शेअर करताना एका युझरनं, “तुमच्यासाठी सरप्राईज आहे”, असे कॅप्शन लिहिले आहे. त्यानंतर बरेच लोक या फोटोवर वेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक असे म्हणत आहेत की ते चवदार असेल. त्याच वेळी, इतर काही म्हणतात की वडा पाव बरोबर हे करू नका, असे मत व्यक्त केले आहे.

एका युझरनं , "याप्रमाणे वडा पाव खराब करू नका", असे सांगितले. तर, दुसर्‍या एका युझरनं, "ही खरोखर वाईट कल्पना नाही ... मला प्रयत्न करून घेण्यास आवडेल".

मुख्य म्हणजे ट्विटरवर ही पहिली वेळ नाही जेव्हा एखाद्याने विचित्र कॉम्बिनेशननं पदार्थ खाल्ला आहे. याआधीही दूधासोबत मॅगी, दाल माखनी कॉफीयांसारखे हटके पदार्थ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: December 12, 2019, 3:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading