मराठी बातम्या /बातम्या /Viral /

दही आणि चिंचेची चटणी टाकून तयार केला ‘गुलाबजाम चाट’, विचित्र डिशचा VIDEO पाहून संतापले नेटकरी

दही आणि चिंचेची चटणी टाकून तयार केला ‘गुलाबजाम चाट’, विचित्र डिशचा VIDEO पाहून संतापले नेटकरी

गोड गुलाबजाम आणि चटपटीत चाट यांचं कॉम्बिनेशन कसं असू शकतं?, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण एका नेटकऱ्याने खरंच हे कॉम्बिनेशन तयार केलंय आणि तो ते खाऊन दाखवतोय

गोड गुलाबजाम आणि चटपटीत चाट यांचं कॉम्बिनेशन कसं असू शकतं?, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण एका नेटकऱ्याने खरंच हे कॉम्बिनेशन तयार केलंय आणि तो ते खाऊन दाखवतोय

गोड गुलाबजाम आणि चटपटीत चाट यांचं कॉम्बिनेशन कसं असू शकतं?, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण एका नेटकऱ्याने खरंच हे कॉम्बिनेशन तयार केलंय आणि तो ते खाऊन दाखवतोय

नवी दिल्ली 27 जून : अनेकांना स्ट्रीट फूड (Street Food) खायला खूप आवडतं. त्यात चाट (Chaat) म्हटलं की तोंडाला पाणी सुटणार नाही, असं शक्यच नाही. रस्त्याने जाताना चाटचा स्टॉल दिसला की तो खाण्यापासून स्वतःला रोखता येत नाही. तुम्ही आतापर्यंत रगडा चाट, समोसा चाट तसंच अनेक प्रकारच्या चाटवर ताव मारला असेल. पण तुम्ही कधी गुलाबजाम चाट (Gulab Jamun Chaat) खाल्लाय का? होय चाटचा असा प्रकार तुम्ही कदाचित ऐकला नसेल; पण एका पठ्ठ्याने गुलाबजाम चाटचा व्हिडिओ शेअर केला आहे.

ऐकावं ते नवल! 8 ग्रॅम कमी झालं समोश्याचं वजन म्हणून प्रशासनाने सील केलं दुकान

गोड गुलाबजाम आणि चटपटीत चाट यांचं कॉम्बिनेशन कसं असू शकतं?, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण एका नेटकऱ्याने खरंच हे कॉम्बिनेशन तयार केलंय आणि तो ते खाऊन दाखवतोय. गुलाबजामपासून तयार केलेल्या चाटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे. सर्वांत आधी गुलाबजामवर गोड दही टाकलंय, त्यानंतर त्यावर चिंचेची चटणी आणि नंतर हिरवी चटणी टाकून शेवटी तो 'पापडी' आणि शेवेनी सजवल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळतंय.

हा गुलाबजाम चाटचा व्हिडिओ पाहून काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. ‘खाद्यपदार्थांचं असं कॉम्बिनेशन बनवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे,’ असं एक नेटकरी म्हणतोय. तर, ‘हा पदार्थ तयार केल्याबद्दल तुला नरकात तेलात तळलं जावं,’ असं एक युजर म्हणाला. एक नेटकरी संताप व्यक्त करत म्हणाला की, ‘यापेक्षा वाईट आणखी काय असू शकतं, कोणी गुलाबजामसोबत असं कसं काय करू शकतं,’ तर काहींनी पदार्थांचं असं वाईट कॉम्बिनेशन तयार करणाऱ्यांवर बंदी घालायली हवी, अशी मागणी केली आहे.

'हे' लॉकेट गळ्यात घाला, डास अजिबात चवणार नाहीत, कंपनीचा मोठा दावा

दरम्यान, गोड पदार्थांसोबत असं कॉम्बिनेशन झाल्याची ही पहिलीच वेळ नाही. या पूर्वी गेल्या वर्षी अशाच एका रसगुल्ला चाटच्या व्हिडिओने धुमाकूळ घातला होता. त्या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती दोन रसगुल्ल्यांमधून साखरेचा पाक पिळतो आणि सर्व्हिंग प्लेटमध्ये ठेवल्यानंतर चिमट्याने त्याचे दोन तुकडे करतो. नंतर त्यावर दही आणि चिंचेची चटणी टाकतो. शेवटी त्यावर काही मसाला, बदाम, काजू, मनुका आणि चिंचेच्या पाण्याचे काही थेंब टाकून सजवतो असं दाखवलं होतं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी हा चाट तयार करणाऱ्याला चांगलंच ट्रोल केलं होतं.

खरं तर असे विचित्र पदार्थ भारतीयांसाठी आता नवीन राहिलेले नाहीत. कोणीतरी पाणीपुरीमध्ये बटाट्याच्या जागी बटर चिकन (Butter Chicken) टाकतं तर कुणी आणखी काहीतरी टाकून वेगवेगळो प्रयोग करतं. या पूर्वी दुधातली आणि चॉकलेट मॅगीही (Chocolate Maggie) चांगलीच व्हायरल झाली होती.

First published:

Tags: Food, Viral video on social media