OMG! चक्क मगरीलाच गोंजरायला गेला आणि... अंगावर काटा आणणारा VIDEO VIRAL

OMG! चक्क मगरीलाच गोंजरायला गेला आणि... अंगावर काटा आणणारा VIDEO VIRAL

एकदा नाही, दोनदा नाही तो पुन्हा पुन्हा त्या मगरीच्या (crocodile) पाठीवरून हात फिरवतो.

  • Share this:

अहमदाबाद, 29 जानेवारी : मगर (crocodile)... जी वाघ, सिंह, बिबट्या अशा प्राण्यांनाही एकाच घटकेत संपवते. एखाद्या गावात अशी मगर दिसली की लोकांमध्ये दहशत निर्माण होते आणि अशी भीती असणंही साहजिकच आहे. जिथं हिंस्र प्राण्यांचंही चालत नाही तिथं माणसांची काय बिशाद. पण एका माणसानं ही डेअरिंग केली. एखाद्या पाळीव प्राण्याला गोंजारावं तसं त्यानं चक्क मगरीला गोंजारलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

एक व्यक्ती स्वतःहून चक्क मगरीच्या जवळ गेली आहे. फक्त तिच्या जवळच गेला नाही तर तिला त्यानं स्पर्शही केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. असं करताना त्या व्यक्तीला भीती वाटत नाही आहे. पण पाहताना आपल्या अंगावर जरूर काटा येतो. देश गुजरात नावाच्या यूट्युब चॅनेलनं मगरीचा हा व्हिडीओ शेअर केला होता. जो गुजरातच्या वडोदरातील असल्याचं सांगितलं जातं आहे.

व्हिडीओत पाहू शकता एका तलावाच्या किनाऱ्यावर मगर निवांत बसलेली आहे. तिथंच तिच्या अगदी जवळ असलेल्या कठड्यावर एक व्यक्ती बसली आहे. ती सतत बडबड करते आहे. त्या मगरीशी बोलते आहे. बोलता बोलता तो मगरीच्या जवळही जातो. मगरीला स्पर्श करतो. ही व्यक्ती नशेत असल्यासारखाही दिसते आहे. पण याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

हे वाचा - Shocking! मासेमारी करताना शार्कच्या जबड्यात गेली बोट; पुढे काय झालं पाहा VIDEO

एकदाच नव्हे तर किती तरी वेळा तो तिला हात लावतो. गाय, कुत्रा, मांजर यांना गोंजारावं तसं तो चक्क मगरीला गोंजारतो.

या व्यक्तीच्या आसपास काही लोक आहे जे त्याला असं करण्यापासून रोखतात. त्यांचा आवाज या व्हिडीओत येतो आहे. पण ही व्यक्ती कुणाचंच ऐकत नाही.

पुन्हा पुन्हा हात लावल्यानं मध्येच मगर हालचालही करते. आपलं तोंड वर काढते आणि तोंडाची दिशा बदलते. पाण्याच्या दिशेनं तोंड करून ती राहते. तेव्हा ही व्यक्ती मगरीच्या शेपटीला पुन्हा हात लावते. मगर पुन्हा हलते. आता ही मगर त्याच्यावर हल्ला करते की काय असंच वाटतं. पण सुदैवानं तसं होत नाही. याचं नशीब बलवत्तर म्हणून तो मगरीचा भक्ष्य बनला नाही. त्या व्यक्तीला कोणताही हानी न पोहोचवता मगर शांतपणे पुन्हा पाण्यात जाते.

हे वाचा - याला म्हणताच जशाच तसं! घोड्याला नाचवणाऱ्या मालकाचं काय झालं पाहा VIDEO

नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार या व्यक्तीनं अधिकाऱ्यांना सांगितलं की, देवी खोडियार त्याच्या स्वप्नात आली होती आणि तिनं मगरीला हात लावायला सांगितलं. मगर ही देवी खोडियारचं वाहन आहे. वडोदरातील वन अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहताच हालचाली सुरू केल्या आहेत. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करून या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे.

First published: January 29, 2021, 7:13 AM IST

ताज्या बातम्या