मराठी बातम्या /बातम्या /Viral /..अन् नवरीचा डान्स पाहून पाहुण्यांनाही अश्रू अनावर; लग्नातील VIDEO ने नेटकऱ्यांनाही केलं भावुक

..अन् नवरीचा डान्स पाहून पाहुण्यांनाही अश्रू अनावर; लग्नातील VIDEO ने नेटकऱ्यांनाही केलं भावुक

सध्या

सध्या

सध्या

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई 21 डिसेंबर : सोशल मीडियावर केवळ एका इमोजीमधून लोकं व्यक्त होतात. असं असतानाही काही पोस्ट मात्र लोकांना व्यक्त व्हायला भाग पाडतात. अशीच एक पोस्ट सध्या खूप व्हायरल होतेय. ही पोस्ट एका लग्नातल्या नवरीची आहे. ‘तुझ में रब दिखता है’ या गाण्यावरचं तिचं नृत्य पाहून तिथे उपस्थित सगळ्यांचे डोळे पाणावले. इतकंच नाही, तर व्हिडिओ पाहून युजर्सही भावुक झाले.

  लग्नात नववधूचं बॉयफ्रेंडसोबत असं कृत्य, पाहून नवरदेवाची येईल किव, पाहा Video

  सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडिओ खूप लोकप्रिय होतात. त्यातही विदाई म्हणजे मुलीच्या पाठवणीच्या व्हिडिओंना युजर्स पसंती देतात. इन्स्टाग्रामवर d_d_makeover_ या आयडीवरून पोस्ट केलेल्या एका नवरीच्या नृत्याला तुफान लाईक्स आणि व्ह्युज मिळालेत. आत्तापर्यंत 44 लाख वेळा हा व्हिडिओ पाहिला गेलाय, तर 3 लाख 80 हजार जणांनी हा व्हिडिओ लाईक केलाय.

  इन्स्टाग्रामवरचा हा व्हिडिओ नवरीच्या डान्सचा आहे, मात्र यात नवरी मुलगी खूप भावूक झालेली दिसते. सामान्यपणे आजकाल लग्नात नवरा-नवरी डान्स करतात. नातेवाईक मंडळीही हौसेनं परफॉर्म करतात. ही एकप्रकारे भावना व्यक्त करण्याची पद्धतच आहे. यात वातावरणही हलकंफुलकं असतं. मजेशीर गाणी आणि नातेवाईक, मित्रमंडळींच्या उत्साहामुळे असे सोहळे लग्नात रंग भरतात. मात्र सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत नवरीच्या परफॉर्मन्समुळे आजूबाजूचे सगळेच भावूक झाले. शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा यांच्या चित्रपटातल्या ‘तुझ में रब दिखता है’ या गाण्यावर डान्स करताना नवरी खूपच भावूक झाली. हा परफॉर्मन्स तिनं तिच्या आई-वडिलांना समर्पित केला. अक्षरशः रडत रडतच तिनं गाण्यावर परफॉर्म केलं. ते पाहणाऱ्या सर्वांनाही रडू आवरलं नाही.

  नवरदेवासमोरच तरुणाने नवरीला उचलून घेतलं अन् पुढे भलतंच कांड घडलं, लग्नातील अजब VIDEO VIRAL

  इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहून युजर्सही खूप भावूक झाले. अनेकांनी त्यावर कमेंट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. हा खूपच इमोशनल क्षण असल्याचं एकानं म्हटलंय, तर हे दृष्य खूपच मन हेलावणारं असल्याचं एकानं लिहिलंय. ‘आत्तापर्यंत नवऱ्यासाठी डान्स करणारी नवरी पाहिली आहे, मात्र आई-वडिलांसाठी डान्स करणारी नवरी पाहिली नव्हती, ताईनं खूपच प्रेमानं परफॉर्म केलंय,’ असंही एका युजरनं म्हटलंय.

  पाठवणीचा क्षण नेहमीच हळवा असतो. मात्र फोटो किंवा व्हिडिओंमध्ये त्या भावना तितक्या प्रकर्षानं व्यक्त होतीलच असं नाही. त्याला अपवाद असे काही व्हिडिओ असतात. ते पाहताना युजर्सचेही डोळे पाणावतात. काही जण त्यावर व्यक्तही होतात. अशा व्हिडिओंना सोशल मीडियावर खूप पसंती मिळते.

  First published:
  top videos

   Tags: Bride, Dance video, Wedding video