मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ओळखा पाहू! हिच्या ड्रेसचा नेमका रंग कोणता? VIDEO पाहून तुम्हाला तरी समजतंय का बघा

ओळखा पाहू! हिच्या ड्रेसचा नेमका रंग कोणता? VIDEO पाहून तुम्हाला तरी समजतंय का बघा

ड्रेसचे वेगवेगळे रंग दिसत असले तरी प्रत्यक्षात एकच रंग आहे.

ड्रेसचे वेगवेगळे रंग दिसत असले तरी प्रत्यक्षात एकच रंग आहे.

ड्रेसचे वेगवेगळे रंग दिसत असले तरी प्रत्यक्षात एकच रंग आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 27 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social media) बरेच गेम (Social media game) आणि चॅलेंजही (Social media challenge) व्हायरल (Viral) होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral video) झाला आहे. ज्यात एका डान्सरने (Dancer video) तिच्या ड्रेसचा नेमका रंग ओळखण्याचं चॅलेंज दिलं आहे (Guess the dancer's dress colour). बऱ्याच नेटिझन्सना तिच्या ड्रेसचा कलर ओळखता आलेला नाही. तुम्हाला तरी हा रंग ओळखता येतो आहे का ते पाहा.

ऑटम क्लेईन (Autumn S. Klein) ही एक डान्सर (Dancer) आणि स्पेशल इफेक्ट आर्टिस्ट (Special effects artist) आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत ती डान्स करताना दिसते आहे आणि डान्स करता करता तिच्या ड्रेसचा रंग बदलतो आहे.

क्लेईनने या व्हिडीओला स्पेशल इफेक्ट दिलेले आहेत. त्यामुळे तिच्या ड्रेसचा रंग बदलताना दिसतो आहे. तिचा ड्रेस हिरवा, जांभळा, गुलाबी, निळा आणि बऱ्याच रंगात दिसतो. पण खरंतर तिचा हा ड्रेस एकाच रंगाचा आहे आणि या विविध रंगांपैकी तिच्या ड्रेसचा खरा नेमका रंग कोणता हेच तुम्हालाहा ओळखायचं आहे. क्लेईनने हे चॅलेंज दिलं आहे.

हे वाचा - OMG! तरुणाने फक्त स्पर्श केला आणि धाडकन कोसळली कार; कसं काय शक्य आहे? पाहा VIDEO

क्लेईनने हा व्हिडीओ पोस्ट करून चॅलेंज देताच अनेक नेटिझन्सनी तिच्या ड्रेसचा नेमका रंग ओळखण्याचा प्रयत्न केला. बहुतेकांनी तिच्या ड्रेसचा रंग हा हिरवा असावा असं म्हटलं आहे. कारण व्हिडीओतील स्पेशल ग्राफिक इफेक्ट हा ग्रीन रंगामुळेच शक्य आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर काही जणांनी तिच्या ड्रेसचा रंग हा जांभळा असल्याचं म्हटलं आहे करण तिच्या ड्रेसच्या किनाऱ्यावर किंचितशी जांभळी रेष दिसते आहे, असं ते म्हणाले. तुम्हाला काय वाटतं या ड्रेसचा रंग कोणता असेल, आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

युझर्सच्या कमेंट पाहिल्यानंतर त्यांनी दिलेली उत्तर पाहिल्यानंतर क्लेईनने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात तिने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तिने आपल्या ड्रेसचा नेमका रंग कोणता ते याच व्हिडीओत दाखवलं आहे. व्हिडीओच्या शेवटी हा रंग दिसतो आणि तो जांभळाच आहे.

First published:

Tags: Game, Viral, Viral videos