VIDEO: ही तर आळशीपणाची हद्दच; पाळीव कुत्रा शांतपणे पाहात होता दरोडा

VIDEO: ही तर आळशीपणाची हद्दच; पाळीव कुत्रा शांतपणे पाहात होता दरोडा

शेतात असलेल्या पाळीव प्राण्यांवर लांडगे, बिबटे यासारखे जंगली प्राणी हल्ला करतात, त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी खास जातीची कुत्री बाळगली जातात. शिकारीसाठीही त्यांचा वापर केला जातो. कुत्र्यांनी माणसाला वाचवल्याच्या, चोरी, घरफोडी यापासून घराचे रक्षण करण्याच्या अनेक कथा आपण वाचतो, ऐकतो.

  • Share this:

मुंबई 3 मार्च:  कुत्रा (Dog) हा माणसाचा सर्वात विश्वासू आणि प्रेमळ मित्र मानला जातो. अनेकजण केवळ सोबत म्हणून नव्हे तर सुरक्षिततेच्या दृष्टीनंही कुत्रा पाळतात. शेतात असलेल्या पाळीव प्राण्यांवर लांडगे, बिबटे यासारखे जंगली प्राणी हल्ला करतात, त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी खास जातीची कुत्री बाळगली जातात. शिकारीसाठीही त्यांचा वापर केला जातो. कुत्र्यांनी माणसाला वाचवल्याच्या, चोरी, घरफोडी यापासून घराचे रक्षण करण्याच्या अनेक कथा आपण वाचतो, ऐकतो.

सध्या मात्र थायलंडमधील (Thailand) एका सायबेरियन हस्की कुत्र्याचा (Siberian Husky Dog) युट्यूबवर ( YouTube) व्हायरल झाला आहे. त्यात काही माणसे एका दागिन्यांच्या दुकानात दागिने चोरत आहेत आणि हा कुत्रा मात्र निवांत झोपलेला दिसत आहे. सुदैव इतकंच की हा दरोडा (Robbery) बनावट होता. या कुत्र्याच्या प्रशिक्षणाचा (Training) हा भाग होता. यात त्या कुत्र्यानं दरोडा रोखण्यासाठी काम करणं अपेक्षित होतं, प्रत्यक्षात मात्र त्यानं निवांत झोपण्याचा मार्ग स्वीकारल्यानं त्याचं प्रशिक्षण अयशस्वी ठरलं आहे. या कुत्र्याच्या वर्तनाबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून, सोशल मीडियावर मजेदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

चियांग मा भागातील एका दागिन्यांच्या दुकानाचा (Jewellery Shop) मालक असलेल्या व्होराउट लोमवावानॉंग याचा लकी (Lucky) नावाचा हा कुत्रा असून, त्याला प्रशिक्षण देऊन दुकानात सुरक्षेसाठी तैनात करण्याची दुकान मालकाची योजना होती. त्यासाठी लोमवावानॉंग त्याच्या कुत्र्याला लकीला प्रशिक्षण देत आहे. जेव्हा सशस्त्र माणसे दुकानात येऊन लोकांना धमकावतील, हल्ला करतील आणि दागिने चोरून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील तेव्हा लकी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना अडवेल, अशी अपेक्षा लोमवावानॉंग याची होती. त्यासाठी त्यानं हा बनावट दरोडा घडवून आणला. ठरल्याप्रमाणे 16 फेब्रुवारी रोजी खोटी स्वयंचलित हँडगन घेतलेल्या माणसानं दुकानात प्रवेश केला आणि लोमवानावॉंगवर बंदूक रोखली. लोमवावानॉंगने बर्यााच वेळा लकीकडे पाहिलं, त्यानं त्या माणसावर उडी मारावी म्हणून त्याला इशारा केला. हल्ला करणारा माणूसही मालकाला धमकावत राहिला; पण लकी जागचा हलला नाही की त्यानं कसला आवाजही केला नाही. तो तथाकथित चोर पैशाची पिशवी घेऊन पळत असतानाही लकी निवांतपणे झोपलेला होता. ही सगळी घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेर्यासत कैद झाली, आणि नंतर हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला.

या प्रकारानंतर लोमवावानॉंगचा अपेक्षाभंग झाला असला तरी त्यानं आपल्या कुत्र्याला रागानं कोणतीही शिक्षा दिलेली नाही. त्याचं आपल्या कुत्र्यावर आजही पूर्वीइतकंच प्रेम आहे. आपल्या कुत्र्याचं प्राधान्य दुसऱ्या गोष्टींना असावं असं समर्थन करत त्यानं आपल्या कुत्र्याची बाजू सावरली आहे. ‘मी त्याचं नाव लकी ठेवलं आहे कारण त्याच्या येण्यानं माझं नशीब उघडलं आहे. कदाचित दुकानाचं रक्षण करणं हे त्याचं ध्येय नसावं, आसपासच्या प्रत्येकाला आनंद देणं हे त्याचं ध्येय असावं.’ असंही लोमवावानॉंगनं म्हटलं आहे.

First published: March 3, 2021, 3:17 PM IST

ताज्या बातम्या