मराठी बातम्या /बातम्या /Viral /

‘शेम शेम शेम...’ लहान मुलांसमोर लेस्बियन कपलनं केले चाळे; व्हिडीओ व्हायरल

‘शेम शेम शेम...’ लहान मुलांसमोर लेस्बियन कपलनं केले चाळे; व्हिडीओ व्हायरल

स्विमिंग पूलमध्ये लहान मुलांसमोर लेस्बियन कपलचे चाळे, महिला म्हणाल्या...शेम शेम शेम

स्विमिंग पूलमध्ये लहान मुलांसमोर लेस्बियन कपलचे चाळे, महिला म्हणाल्या...शेम शेम शेम

स्विमिंग पूलमध्ये लहान मुलांसमोर लेस्बियन कपलचे चाळे, महिला म्हणाल्या...शेम शेम शेम

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 5 जून: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये (California)सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या एका घटनेमुळे वाद निर्माण झाला आहे. इथल्या एका हॉटेलमधील स्विमिंग पूलमध्ये एका कृष्णवर्णीय लेस्बियन कपलने (Black Lesbian Couple) किस केला आणि इतर चाळे केले असा दावा त्या ठिकाणी उपस्थित इतर महिलांनी केला आहे. या महिलांनी फक्त किसिंग न करता अधिक कामूक चाळे (Intimate)केल्याचं या महिलांचं म्हणणं आहे. हा सगळा प्रकार सुरू असताना या महिला त्या कपलच्या दिशेनी धावून गेल्या आणि जोरजोराने शेम शेम शेम असं ओरडल्या. या घटनेचा व्हिडिओ आर्ट कालिगोसने रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. त्यामुळे संपूर्ण अमेरिकेत तो व्हायरल (Viral Video) झाला.

इतर महिलांनी त्या कृष्णवर्णीय लेस्बियन (समलिंगी) जोडप्याला खडसावण्यामागे कारण हे होतं की सार्वजनिक ठिकाणी हे सगळं करणं योग्य नाही. त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या स्विमिंग पूलच्या आजूबाजूला पूलमध्ये बरीच लहान मुलं (Children) होतं. तसंचच हॉटेलमधून बाहेर जाणाऱ्या लोकांमध्येही लहान मुलं बरीच होती. त्यामुळे त्या कपलने केलेलं कृत्य लज्जास्पद होतं असं या महिलांचं मत होतं. त्यांना तातडीने ‘शेम शेम शेम’ ओरडल्यामुळे ते कृष्णवर्णीय कपल तिथून निघून गेलं.

बापरे! तब्बल 120 वर्षांपासून सलग जळतोय हा बल्ब, वाचा त्याच्या दीर्घायुष्याची अनोखी कथा

" isDesktop="true" id="561133" >

महिला एका वर्षात 20 मुलांची झाली आई; देखभालीसाठी 16 जणांची नेमणूक, आठवड्याला लाखोंचा खर्च

कपलनेही बाजू मांडली

या लेस्बियन कपलपैकी एक महिला डोमिनिकी वेस्लीनी नंतर माध्यमांसमोर येऊन आपलं म्हणणं स्पष्ट केलं. ती म्हणाली, ‘हे असं सार्वजनिक ठिकाणी एखाद्या समलिंगी कपलला शेम शेम करून हाकलणं खूप निराशाजनक आहे.’ डोमिनिकीच्या एका अज्ञात प्रवक्त्याने सांगितलं की या कपलला हाकलणाऱ्या महिलांनी त्यांच्याबद्दल अश्लाघ्य भाषेत कमेंट केल्या त्यामुळे त्यांना अपमान सहन झाला नाही आणि ते कपल निघून गेलं.

‘वॉक ऑफ शेम’शी तुलना

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर संपूर्ण जगातून प्रतिक्रिया आल्या. नेटिझन्सनी ट्विटरवर परस्परभिन्न प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटलंय की सार्वजनिक ठिकाणी असा वाद होणं गरजेचं नव्हतं. तर काहींनी त्या कपलला दोषी ठरवलं आहे. या व्हिडिओतील दृष्याची तुलना काही नेटिझन्सनी गेम ऑफ थ्रोन्स (Game of Thrones) च्या पाचव्या सिझनमध्ये क्रिसी लॅनिस्टर (Cersei Lannister) या काल्पनिक पात्राने केलेल्या सुप्रसिद्ध 'वॉक ऑफ शेम' (Walk Of Shame) शी केली आहे. तसंच हा व्हिडिओ पाहिला तर असंही दिसतंय की स्विमिंग पूलमधले चाळे पाहून काही महिला पट्कन हॉटेलच्या बाहेर निघून गेल्या.

First published:

Tags: Shocking news, Shocking viral video