• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बापरे! मगरीच्या दातानं बिअरची बॉटल उघडत होता युवक अन्...; VIDEO पाहून फुटेल घाम

बापरे! मगरीच्या दातानं बिअरची बॉटल उघडत होता युवक अन्...; VIDEO पाहून फुटेल घाम

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मगरीसोबत (Crocodile Video) मस्ती करत असल्याचं दिसत आहे. तो वारंवार पाण्यात असलेल्या मगरीला हात लावण्याचा प्रयत्न करत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 18 जुलै : सोशल मीडियाच्या (Social Media) दुनियेत कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. दररोज इथे नवनवे व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्याचं पाहायला मिळतं. काही व्हिडिओ खळखळून हसवणारे असतात, तर काही हैराण करणारे. काही व्हिडिओ तर असे असतात जे लोकांची मनं जिंकतात. सध्या एक असाच मजेशीर व्हिडिओ (Funny Video) चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. VIDEO: कोरोनाचा परिणाम? लॉकडाउनमध्ये जन्मलेल्या मुलीला सर्वत्र दिसतंय सॅनिटायझर आपल्याला सर्वांना हे माहिती आहे, की मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर फिरण्यासाठी गेल्यावर आपण ही ट्रीप (Trip) पूर्णपणे इन्जॉय करतो. मात्र, अनेकदा मजा अन् मस्तीच्या नादात अशा गोष्टी केल्या जातात ज्या स्वतःच्या जीवासाठीही घातक ठरतात. काहीतरी वेगळं करण्याच्या नादात अनेकजण जीवाचीही पर्वा करत नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यात एक व्यक्ती मगरीसोबत (Crocodile Video) मस्ती करत असल्याचं दिसत आहे. फेक नावानं ऑनलाईन क्लासमध्ये प्रवेश; कॅमेरा सुरू करत काढले सर्व कपडे अन्.. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की काही लोकांचा एक ग्रुप बोटवर बसून मजेत पाण्यात फिरत आहेत. त्यातील एक वारंवार पाण्यात असलेल्या मगरीला हात लावण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर मगर आपलं तोंड उघडताच तो बिअरचं कॅन तिच्या दातांमध्ये अडकवतो. यामुळे ते उघडून बिअर बाहेर येऊ लागते. अशात दुसरा एकजण पटकन हे कॅन हातात घेतो आणि बिअर पिऊ लागतो. बोटवर असणारे इतर लोक ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात. हा मजेशीर व्हिडिओ ट्विटर यूजर @photocliks नं शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शनही देण्यात आलं आहे. कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, की फ्लोरिडामधील एक सामान्य दिवस. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. तर, व्हिडिओला 5 हजारहून अधिकांनी लाईक केलं आहे. हा व्हिडिओ अनेकांनी मजेशीर असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी या युवकांच्या धाडसाचं कौतुकही केलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: