मराठी बातम्या /बातम्या /Viral /28 KM केली पायपीट; अखेर रात्रभर चालल्यावर सकाळी मंडपात पोहोचला नवरदेव, का आली ही वेळ?

28 KM केली पायपीट; अखेर रात्रभर चालल्यावर सकाळी मंडपात पोहोचला नवरदेव, का आली ही वेळ?

चालकांच्या संपामुळे वराला आणि त्याच्या कुटुंबाला लग्नासाठी चक्क पायी चालत जावं लागल्याची घटना समोर आली आहे. वधूच्या गावात पोहोचण्यासाठी त्यांना 28 किलोमीटर चालावं लागलं.

चालकांच्या संपामुळे वराला आणि त्याच्या कुटुंबाला लग्नासाठी चक्क पायी चालत जावं लागल्याची घटना समोर आली आहे. वधूच्या गावात पोहोचण्यासाठी त्यांना 28 किलोमीटर चालावं लागलं.

चालकांच्या संपामुळे वराला आणि त्याच्या कुटुंबाला लग्नासाठी चक्क पायी चालत जावं लागल्याची घटना समोर आली आहे. वधूच्या गावात पोहोचण्यासाठी त्यांना 28 किलोमीटर चालावं लागलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Odisha (Orissa), India

भुबनेश्वर 20 मार्च : चालकांच्या संपामुळे वराला आणि त्याच्या कुटुंबाला लग्नासाठी चक्क पायी चालत जावं लागल्याची घटना समोर आली आहे. ओडिशातील रायगडा जिल्ह्यातील वधूच्या गावात पोहोचण्यासाठी त्यांना 28 किलोमीटर चालावं लागलं. ते गुरुवारी रात्री कल्याणसिंगपूर ब्लॉकच्या सुनखंडी पंचायतीमधून पायी चालत दिबालापाडू गावाकडे निघाले, तिथे शुक्रवारी लग्न झालं.

विवाह सुरू असतानाच नवरदेवाच्या मित्राचं नवरीसोबत विचित्र कृत्य; भडकलेल्या वधूने लग्नच मोडलं

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नवरदेव, त्याचे कुटुंबीय आणि काही महिला रात्री रस्त्याने चालताना दिसत आहेत. वराच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, "चालकांच्या संपामुळे कोणतीही वाहतूक उपलब्ध नव्हती. आम्ही रात्रभर चालत गावात पोहोचलो. आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता."

[gallery ids="852411"]

शुक्रवारी सकाळी विवाह सोहळा पार पडला, परंतु वर आणि त्याचे कुटुंब वधूच्या घरीच थांबले. ते चालक संघटना संप मागे घेण्याची वाट पाहत होते, जेणेकरून ते घरी जाऊ शकतील. विमा, पेन्शन आणि कल्याणकारी मंडळाची स्थापना यासारख्या सामाजिक कल्याणकारी उपाययोजनांच्या मागणीसाठी चालक एकता महासंघाने बुधवारपासून राज्यभर बेमुदत संप सुरू केला आहे. राज्य सरकारने त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिल्यानंतर ओडिशातील व्यावसायिक वाहन चालकांचा संप शुक्रवारी 90 दिवसांसाठी स्थगित करण्यात आला.

वधूचे काका म्हणाले, "आम्ही आदिवासी आहोत. चालण्याची सवय आहे. रात्रीच्या वेळीही आम्हाला रस्त्यांची ओळख आहे आणि लग्नसोहळ्यासाठी पायी जाणे सामान्य होते. मात्र, मागील काही वर्षांपासून वाहने वापरली जात आहेत." दोन लाखांहून अधिक चालकांच्या संपामुळे कामावर जाणारे लोक आणि पर्यटकांसह सर्वांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Bridegroom, Wedding