Home /News /viral /

वरमाळा गळ्यात पडताच नवरदेवानं काढला मंडपातून पळ; नवरीच्या वहिनीसोबत बांधली लग्नगाठ

वरमाळा गळ्यात पडताच नवरदेवानं काढला मंडपातून पळ; नवरीच्या वहिनीसोबत बांधली लग्नगाठ

वरमाळा घातल्यानंतर आणि फेरे घेण्यापूर्वी नवरदेवानं मंडपातून पळ काढला आणि नंतर दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केलं. लग्नही त्या मुलीसोबत केलं जिच्यासोबत त्याच्या होणाऱ्या मेव्हुण्याचं लग्न होणार होतं.

    नवी दिल्ली 06 जुलै : एका गावात दोन दिवसांआधी लग्नसमारंभादरम्यान (Marriage Function) एक विचित्र घटना घडली. वरमाळा घातल्यानंतर आणि फेरे घेण्यापूर्वी नवरदेवानं मंडपातून पळ काढला आणि नंतर दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केलं. लग्नही त्या मुलीसोबत केलं जिच्यासोबत त्याच्या होणाऱ्या मेव्हुण्याचं लग्न होणार होतं. ही घटना राजस्थानच्या (Rajasthan) तारपुरा गावातील आहे. OMG! मानवी वस्तीत घुसलेल्या हत्तीचा धुमाकूळ; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO 3 जुलै रोजी नवरदेव (Groom) अजयनं लग्नात नवरी (Bride) सुभिताला वरमाळा घातली. असा आरोप आहे, की यानंतर नवरदेव आणि त्याच्या वडिलांनी नवरीच्या वडिलांकडे सव्वा लाख रुपये आणि बाईक देण्याची मागणी केली. मात्र, नवरीच्या वडिलांनी आपल्याकडे इतके पैसे नसल्याचं स्पष्ट केलं. नवरीबाई मंडपात वाट पाहत राहिली, तर नवरदेव अजय टॉयलेटला जाण्याच्या बहाण्यानं तिथून फरार झाला. यानंतर सर्व वरातीही परत गेले. यानंतर नवरीनं नवरदेव आणि त्याच्या घरच्यांविरोधात तक्रार केली. VIDEO: चुलीवर चपाती बनवणाऱ्या तरुणीचे जबरदस्त हावभाव; सौंदर्यावर नेटकरी फिदा याच कारणामुळे पाच जुलै रोजी होणारं नवरीच्या भावाचं लग्नही टळलं. तारपुरा गावातील कंचन नावाच्या एका मुलीसोबत नवरीच्या भावाचं लग्न ठरलं होतं. यानंतर अजयनंच सुभिताच्या होणाऱ्या वहिनीसोबत म्हणजेच कंचनसोबत लग्नगाठ बांधली. सुभिताच्या घरच्यांचं म्हणणं आहे, की नवरदेव खासगी कंपनीत जॉब करत असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात असं काहीही नव्हतं. असं असूनही ऐन लग्नात नवरदेवाच्या वडिलांनी पैशांची, दागिन्यांची आणि गाडीची मागणी केली. नवरीच्या वडिलांनी हात जोडून विनंती करूनही काहीही फायदा झाला नाही आणि नवरदेवानं नवरीच्या होणाऱ्या बहिणीसोबतच लग्नगाठ बांधली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Marriage, Viral news, Wedding

    पुढील बातम्या