• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO : मंडपातच ढसाढसा रडू लागला नवरदेव; पाहा नेमकी काय आहे भानगड

VIDEO : मंडपातच ढसाढसा रडू लागला नवरदेव; पाहा नेमकी काय आहे भानगड

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Wedding Video) पाहायला मिळतं, की नवरीबाई मंडपात बसलेली आहे आणि ती पाठवणीसाठी उठून उभा राहते. इतक्यात नवरदेव आपल्या नवरीबाईला पाहून अतिशय इमोशनल होतो.

 • Share this:
  नवी दिल्ली 05 नोव्हेंबर : असं म्हटलं जातं, की मुलीचं जेव्हा लग्न ठरतं तेव्हा ती अतिशय भावुक (Emotional Bride) होते. आपल्या कुटुंबीयांबद्दल असलेल्या प्रेमामुळे घर सोडण्याची तिची इच्छा नसते. मात्र, जेव्हा पाठवणीची वेळ येते तेव्हा नवरी कुटुंबीयांच्या गळ्यात पडून मोठमोठ्यानं रडते. तिला पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावतात. भरधाव वेगातील दुचाकीस्वाराला गाईनं शिंगावर घेतलं अन्...; SHOCKING VIDEO लग्नात अनेकदा तुम्ही नवरीबाईला रडताना पाहिलं असेल. मात्र, नवरदेव अगदी थाटात स्टेजवर बसलेला असतो. नवरदेवाच्या घरचे नवरीला अगदी नाचत-गात आपल्या घरी घेऊन जातात. मात्र, तुम्ही असं कधी पाहिलंय का, की नवरीबाईला पाहून नवरदेवच इमोशनल झाला आणि रडू लागला (Groom Started Crying After Seeing Bride). सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Groom) होत आहे.
  व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Wedding Video) पाहायला मिळतं, की नवरीबाई मंडपात बसलेली आहे आणि लग्नाचे विधी पूर्ण होताच ती पाठवणीसाठी उठून उभा राहते. इतक्यात नवरदेव आपल्या नवरीबाईला पाहून अतिशय इमोशनल होतो. तो सर्वांसमोरच रडू लागतो. यानंतर तो नवरीचे अश्रूही पुसतो. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित इतर पाहुणेही भावुक होतात. म्हातारपणी आजीबाईला लागला वेगळाच नाद; ती अजब इच्छा ऐकून घरचेही शॉक इन्स्टाग्रामवर वेडिंग्स बाय रिफ्लेक्शन नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर, अनेकांनी या व्हिडिओवर आपली प्रतिक्रियाही दिली आहे. एका यूजरनं लिहिलं, इतका सुंदर क्षण कॅप्चर करण्यासाठी धन्यवाद.
  Published by:Kiran Pharate
  First published: