Home /News /viral /

नवरीचा डान्स पाहून भडकला नवरदेव; मंडपातच लगावली कानशिलात, थेट पोलिसांत पोहोचलं प्रकरण

नवरीचा डान्स पाहून भडकला नवरदेव; मंडपातच लगावली कानशिलात, थेट पोलिसांत पोहोचलं प्रकरण

एका नवरदेवाने आपली नवरी चुलत भावासोबत डान्स (Bride Dance) करत असताना तिच्या कानशिलात लगावली

  चेन्नई 22 जानेवारी : तमिळनाडूच्या कुड्डालोर येथून एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. यात एका नवरदेवाने आपली नवरी चुलत भावासोबत डान्स (Bride Dance) करत असताना तिच्या कानशिलात लगावली (Groom Slapped a Bride in Wedding Hall). ही बाब इतकी वाढली की नवरीच्या घरच्यांनी लगेचच हे लग्न रद्द करत नवरीसाठी दुसरा नवरदेव शोधला आणि तिचं लग्न लावून दिलं. आता पहिल्यावाल्या नवरदेवाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. नवरदेवाच्या बहिणीची नवरीसोबत विचित्र मस्करी; क्षणात दुःखात बदललं आनंदाचं वातावरण द टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, नवरदेव चेन्नईच्या एका खासगी कंपनीमध्ये सिनीअर इंजिनिअर आहे. मागील 6 नोव्हेंबरला त्याचा साखरपुडा झाला होता. या मुलाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि मुलीच्या कुटुंबीयांकडे 7 लाखांची भरपाई मागितली आहे. मुलाचं असं म्हणणं आहे, की लग्नाच्या तयारीसाठी त्याने सात लाख रुपये खर्च केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, 19 जानेवारीला लग्नाच्या एका कार्यक्रमादरम्यान नवरी आणि नवरदेव सोबत डान्स करत होते. यादरम्यान नवरीचा चुलत भाऊही तिथे येतो आणि वधू-वरांच्या खांद्यावर हात ठेवून नाचू लागतो. पण वराला ही गोष्ट आवडली नाही. चुलत भाऊ निघून जाईपर्यंत त्याने वाट पाहिली आणि नंतर रागात त्याने नवरीला चापट मारली.

  VIDEO - Surprise म्हणत दरवाजा उघडला पण...; अशा अवस्थेत दिसले पालक की पळाला लेक

  ही बाब नवरीला आणि तिच्या कुटुंबीयांना खटकली. कारण नवरदेवाने सर्व नातेवाईकांसमोर नवरीवर हात उचलला. त्याने कशाचीही पर्वा केली नाही. पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं की मुलाची तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे. मात्र, त्याच्यावरही नवरीला चापट मारल्याचा आरोप आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. इकडे नवरीच्या घरच्यांनी आपल्या नात्यातील एक मुलगा शोधून नवरीचं लग्न ठरवलं. दोघंही 20 जानेवारीला लग्नबंधनात अडकले.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Bride, Shocking news, Wedding

  पुढील बातम्या