Google Map नं चुकवले चौघांच्या आयुष्याचे रस्ते; चुकून दुसऱ्याचं मंडपात पोहोचला नवरदेव, वाचा पुढे काय घडलं..

एक युवक गूगल मॅपच्या (Google Map) मदतीनं चुकीच्या पत्त्यावर पोहोचला आणि दुसऱ्याच मुलीसोबत त्याचं लग्न (Marriage) होता होता राहिलं.

एक युवक गूगल मॅपच्या (Google Map) मदतीनं चुकीच्या पत्त्यावर पोहोचला आणि दुसऱ्याच मुलीसोबत त्याचं लग्न (Marriage) होता होता राहिलं.

  • Share this:
    नवी दिल्ली 11 एप्रिल : आधुनिक तंत्रज्ञानानं आपल्या जीवनात अनेक बदल घडवले आहेत. गूगल मॅप (Google Map) हेदेखील यातीलच एक उदाहरण. रोजच्या जीवनात बऱ्याचदा आपण गूगल मॅपची मदत घेताना दिसतो. अनोळखी ठिकाणीदेखील बरोबर रस्ता दाखवण्याचं काम गूगल मॅप करतं. मात्र, याचा जितका फायदा आहे तितकंच नुकसानही कधी कधी होऊ शकतं. कारण, असतं यात होणाऱ्या तांत्रिक अडचणी. अशीच एक घटना घडली आहे इंडोनेशियामध्ये. इथे एक युवक गूगल मॅपच्या मदतीनं चुकीच्या पत्त्यावर पोहोचला आणि दुसऱ्याच मुलीसोबत त्याचं लग्न (Marriage) होता होता राहिलं. इंडोनेशियामध्ये गूगल मॅपच्या चुकीमुळं एक नवरदेव दुसऱ्याच एका लग्नाच्या कार्यक्रमात पोहोचला. याठिकाणी त्यांचं स्वागतही केलं गेलं आणि त्यांना नाश्ताही देण्यात आला. कुटुंबातील काही सदस्यांमध्ये बातचीत सुरु असतानाच नवरीच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या ही गोष्ट लक्षात आली. लग्नाआधीच ही बाब लक्षात आल्यानं परिस्थिती सावरुन नेण्यात आली. बँड-बाजासह बलात्काराच्या आरोपीच्या घरी पोहचले पोलीस, Video Viral ट्रिब्यूनल न्यूजच्या वृत्तानुसार, त्यादिवशी दोन कार्यक्रम होते, एक लग्न आणि एक साखरपुड्याचा. हे दोन्ही कार्यक्रम एकाच गावात असल्यानं गोंधळ झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नवरीला सुरुवातीला हे सगळं माहिती नव्हतं, कारण ती मेकअप रुममध्ये तयार होण्यात व्यग्र होती. आता या घटनेचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. कोम्पसच्या रिपोर्टनुसार, एका व्यक्तीनं आपल्या लग्नाच्या कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचण्यासाठी गूगल मॅपची मदत घेतली. या युवकाला मध्य जावाच्या पाकीस जिल्ह्यातील लॉसारी हेमलेट येथे जायचं होतं. मात्र, गूगल मॅपच्या मदतीनं तो जेंगकोल हेमलेट इथे पोहोचला. या दोन्ही स्थळांमध्ये जास्त अंतर नव्हतं. इथे नवरी मारिया उल्फा आणि बुरहान सिद्दीकी यांचा साखरपुडा होणार होता. मात्र, चुकून तिथे लग्न असलेला युवक पोहोचला. ज्या तरुणीचा साखरपुडा होणार होता तिनं सांगितलं, की या सर्वांना तिथे पाहून तिला धक्का बसला कारण यातील कोणालाच ती ओळखत नव्हती. तिनं सांगितलं, की मला धक्काच बसला, कारण हा तो मुलगा नव्हता ज्याच्यासोबत माझा साखरपुडा होणार होता. यानंतर मुलाच्या चुलत्यांना ही बाब लक्षात आली. यानंतर मुलाकडच्या लोकांनी त्यांची माफी मागत त्यांची मदत घेतली आणि योग्य ठिकाणी पोहोचले. ही घटना सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published: