मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पैसे मागणाऱ्या मेहुण्यांकडे नवरदेवाची अजब मागणी; ऐकून मंडपात पिकला हशा, VIDEO

पैसे मागणाऱ्या मेहुण्यांकडे नवरदेवाची अजब मागणी; ऐकून मंडपात पिकला हशा, VIDEO

व्हि़डिओमध्ये (Funny Video of Groom) पाहायला मिळतं, की वरात येताच घरातील सर्व मुली दरवाजात जाऊन उभा राहतात

व्हि़डिओमध्ये (Funny Video of Groom) पाहायला मिळतं, की वरात येताच घरातील सर्व मुली दरवाजात जाऊन उभा राहतात

व्हि़डिओमध्ये (Funny Video of Groom) पाहायला मिळतं, की वरात येताच घरातील सर्व मुली दरवाजात जाऊन उभा राहतात

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 26 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) सतत लग्नसमारंभातील निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral) होत असतात. लग्नाच्या वरातीतील डान्सपासून नवरी नवरदेवाचे काही मजेशीर किंवा इमोशनल व्हिडिओ (Bride and Groom Videos) यात पाहायला मिळतात. लग्नाच्या दिवशी बऱ्याच घरात एक प्रथा आहे, नवरदेव लग्नासाठी गेटवर येताच मेहुण्या त्याला थांबवतात आणि पैसे घेतल्याशिवाय आतमध्ये प्रवेश देत नाहीत. याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पैसे मागणाऱ्या मेहुण्यांना नवरदेव अगदी मजेशीर अंदाजात उत्तर देतो.

प्रसूतीदरम्यान घडलं असं काही की जोरजोरात ओरडू लागली महिला; पाहून सगळेच हैराण

व्हि़डिओमध्ये (Funny Video of Groom) पाहायला मिळतं, की वरात येताच घरातील सर्व मुली दरवाजात जाऊन उभा राहतात. इथे येऊन त्या नवरदेवाला म्हणतात, की राजा बनून आले आहात तर थोडे आमचे हातही ओले करा. या तरुणी नवरदेवाकडे पैशाची मागणी करत असतात. नवरदेवही अगदी मजेशीर अंदाजात त्यांना उत्तर देतो. नवरदेव म्हणतो, त्याचं असं आहे की पैसे मेहनतीनं मिळतात. मी आता थकलोय.. माझे खांदे दाबा, पाय दाबा. मग पैसे मिळतील. नवरदेवाचं हे उत्तर ऐकून सगळेच हसू लागतात.

हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. सोबतच अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 30 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे, तर अनेकांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ thehouseofbride पेजवरुन अपलोड केला गेला आहे.

धक्कादायक! ...म्हणून बॉयफ्रेंडनं डोळ्यात टाकला Glue; भयंकर झाली तरुणीची अवस्था

एका यूजरनं या व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं, की हे चुकीचं आहे. हा तर त्या मुलींचा हक्क आहे. नवीन नवीन काहीतरी गोष्ट आणू नका. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, मुलींसोबत असंच व्हायला पाहिजे. यांना प्रत्येकच ठिकाणी पैसे हवे असतात. तिसऱ्या यूजरनं लिहिलं, असे दाजी आम्हाला तर नाही मिळाले, आम्हाला लग्नाच्या दिवशी पैसे मिळाले होते. इतरही अनेकांनी या मजेशीर व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

First published:

Tags: Viral video on social media, Wedding video