Home /News /viral /

VIDEO: अचानक स्टेजवरच नवरदेवानं नवरीला उचलून घेतलं अन्...; ते दृश्य पाहून पाहुणेही चक्रावले

VIDEO: अचानक स्टेजवरच नवरदेवानं नवरीला उचलून घेतलं अन्...; ते दृश्य पाहून पाहुणेही चक्रावले

लग्नाच्या कार्यक्रमावेळी अनेकदा नवरदेव आणि नवरीही (Bride and Groom) एकमेकांसोबत मस्ती करण्याची संधी सोडत नाहीत. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.

  नवी दिल्ली 31 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) बऱ्याचदा लग्नसमारंभातील मजेशीर व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. काही व्हिडिओमध्ये नवरदेव स्टेजवरच कोसळतो तर काही व्हिडिओमध्ये नवरीची मस्ती पाहायला मिळते. लग्नातील विनोदी आणि काही थक्क करणारे व्हिडिओ सतत व्हायरल (Video Viral) झाल्याचं पाहायला मिळतं. लग्नाच्या कार्यक्रमावेळी अनेकदा नवरदेव आणि नवरीही (Bride and Groom) एकमेकांसोबत मस्ती करण्याची संधी सोडत नाहीत. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. अजबच! चक्क कुत्रा चालवतोय सायकल; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक नवरी आणि नवरदेवाच्या बऱ्याच जोड्या लग्नात लाजताना दिसतात मात्र काही जोडपी एकदम न लाजता आपलं लग्न मस्ती करत एन्जॉय करतात. सध्या लग्नातील असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, यात नवरदेवानं केलेल्या कृत्यामुळे नवरी लाजली आणि स्टेजवरच ती आपला चेहरा लपवू लागली. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरी आपल्या घरच्यांसोबत उभा आहे. इतक्यात नवरदेव तिथे येतो आणि नवरीला खांद्यावर उचलून घेतो. यानंतर तो तिला शेजारीच असलेल्या सोफ्यावर बसवतो. नवरदेवाच्या या कृत्यामुळे नवरी लाजते. नवरीला जराही कल्पना नव्हती की नवरदेव असं काही करणार आहे.
  VIDEO: अचानक नवरीला मारू लागला भाऊ; नवरदेवानं मंडपातच केली मेहुण्याची धुलाई सोशल मीडियावर या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. एकाला यूजरनं म्हटलं, की हा पूर्णतः चित्रपटांचा परिणाम आहे. आणखी एका यूजरनं म्हटलं, की इतकी काय घाई होती. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ निरंजन महापात्रा नावाच्या व्यक्तीनं इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Video viral, Wedding video

  पुढील बातम्या