मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नात नवरदेवालाच No Entry! मंडपाबाहेर बसून फोनवर पाहिलं स्वतःचंच Wedding; नेमकं काय आहे प्रकरण पाहा

लग्नात नवरदेवालाच No Entry! मंडपाबाहेर बसून फोनवर पाहिलं स्वतःचंच Wedding; नेमकं काय आहे प्रकरण पाहा

नवरदेवाला स्वतःच्याच लग्नाचा सोहळा हॉलबाहेर बसून मोबाईलवर पाहण्याची वेळ ओढावली.

नवरदेवाला स्वतःच्याच लग्नाचा सोहळा हॉलबाहेर बसून मोबाईलवर पाहण्याची वेळ ओढावली.

नवरदेवाला स्वतःच्याच लग्नाचा सोहळा हॉलबाहेर बसून मोबाईलवर पाहण्याची वेळ ओढावली.

  • Published by:  Priya Lad

बीजिंग, 30 एप्रिल : लग्न म्हणजे नवरा आणि नवरी आलेच. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल सध्या अशा एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात नवरदेवाला त्याच्या लग्नात एंट्री देण्यात आली नाही. त्यातही शॉकिंग म्हणजे लग्नमंडपाबाहेर बसून या नवरदेवाने आपल्याच लग्नाचा सोहळा मोबाईलवर लाइव्ह पाहिला. चीनमधील या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे (Groom not get entry in his own marriage).

व्हिडीओत पाहू शकता जो तरुण मोबाईल हातात घेऊन दिसतो आहे तो नवरदेव आहे. त्याच्या मोबाईलमध्ये तो लग्नाचा व्हिडीओ पाहतो आहे. ज्यात एक व्हाइट वेडिंग गाऊन घातलेली नवरी दिसते आहे. हे त्याचंच लग्न असून स्वतःच्याच नवरीची एंट्री मोबाईलवर पाहतो आहे. आता तो कुठे अडकला आहे किंवा कुठे दूर आहे तर तसंही नाही. तो अगदी जिथं त्याचं लग्न होत आहे, त्याच हॉल किंवा हॉटेलबाहेर बसला आहे. सभागृहासमोर बसून तो मोबाईलवर आपल्याच लग्नाचा सोहळा पाहतो आहे. नवरदेवाची ही परिस्थिती पाहून त्याचे मित्र त्याची मजा घेत आहेत. नवरदेवाला रडू येत आहे आणि हसूही.

हे वाचा - एअरपोर्टवर BF ने केलं ब्रेकअप, तरुणीने विमान हलवून टाकलं; शेवटी एअरलाइन्सने...

इनसाइडरच्या रिपोर्टनुसार कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये चीनमध्ये कोरोनाचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत आणि याच कठोर कोरोना नियमांमुळे नवरदेव स्वतःच्याच लग्नात जाऊ शकला नाही.  वराच्या कोरोना तपासणी नियमात अचानक बदल झाला. त्यामुळे नवरदेवावर अशी वेळ ओढावली.

नवरदेवाची कोरोना टेस्ट झाली नव्हती. नवरदेवाने सांगितलं की, "हॉटेल प्रशासनाने एंट्रीसाठी चार दिवसांचा कोरोना रिपोर्ट असेल तरी चालेल असं सांगितलं होतं. पण लग्नाच्या दिवशी हॉटेलने 48 तासांतील रिपोर्ट मागितला.  त्याच्याकडे हा रिपोर्ट नव्हता त्यामुळे त्याला आत प्रवेश दिला नाही. त्याने लगेच जवळच्या रुग्णालयात जाऊन कोरोना टेस्ट केली पण रिपोर्ट यायला वेळ लागणार होता. तोपर्यंत त्याला बाहेरच थांबावं लागलं"

हे वाचा - VIDEO : वरमाळेच्या कार्यक्रमादरम्यान कोसळलं लग्नाचं स्टेज; खाली पडणाऱ्या नवरीला वाचवण्यासाठी धावला नवरदेव अन्..

लग्न दुपारी दोन वाजता होतं. लग्नाचे काही विधी झाले. रिपोर्ट आल्यानंतर त्याला सायंकाळी 4.34 वाजता एंट्री मिळाली. शेवटी 6 वाजता त्या दोघांचं लग्न पार पडलं.

First published:

Tags: Bridegroom, China, Coronavirus, Viral, Viral news, Wedding