मुंबई 31 जानेवारी : लग्न हा प्रत्येक मुलामुलीसाठी एक महत्वाचा क्षण असतो. कारण या नंतर त्यांच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होणार असते. त्यामुळे हा दिवस त्याच्या नेहमी लक्षात राहावा असं मुलगा-मुलगी दोघांनाही वाटत असतं. पण बऱ्याचदा काही कारणांमुळे लग्नमंडपात देखील अनेक लग्न तुटल्याचे तुम्ही ऐकलं असेल.
सध्या अशीच एक कहाणी समोर आली आहे. ज्याबद्दल ऐकून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल. या प्रकरणात भर लग्नात नवरदेव नववधूसोबत असं काहीतरी करुन बसला, ज्यामुळे त्यांचं लग्नच मोडलं.
हे ही पाहा : 'चाकू' घेऊन मुलगी मॉलमध्ये शिरली आणि पुढच्या क्षणी.... व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
कानपूर येथील निवृत्त वायुसेना जवान वासदेव कटियार यांचा मुलगा अमित कटियार याचा विवाह गावातील भावनासोबत ठरला. तो मुलीच्या घरी वरात घेऊन वऱ्हाड्यांसोबत पोहोचला. वऱ्हाड्यांचे पूर्ण विधी आणि स्वागत झाल्यानंतर
जयमाला कार्यक्रम झाला. रात्री उशिरा नैवेद्य सोहळा पार पडला. त्या दरम्यान अचानक वधू आणि तिच्या आईने मुलाशी लग्न करण्यास नकार दिला.
असे सांगितले जात आहे की, नवरदेव नशेच्या अवस्थेत अनेक वेळा वधूच्या खोलीत आला आणि म्हणाला की तो तिला एक वर्ष तिची विदाई होणार नाही आणि जर नववधूला शिक्षण पूर्ण करायचं असेल तर कानपूरमधूनच करावं लागेल, इथून तिला करता येणार नाही. या सर्व गोष्टींवर पुढे वाद वाढला.
जेव्हा वराच्या वडिलांनी सगळं शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ही हे भांडण वाढत गेलं आणि ते एकमेकांशी भांडले, त्यामुळे लग्नाचे इतर विधी थांबले. आधी ठरलेल्या गोष्टींनुसार वधू पक्षाने स्वागत आणि लग्न समारंभ पार पाडला नाही, असा आरोप मग वराच्या बाजूने करण्यात आला.
घटनास्थळी पोहोचलेले चौकी प्रभारी राजोल नगर यांनी दोन्ही पक्षांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही निष्पन्न झाले नाही. हाणामारीची परिस्थिती आल्यावर दोन्ही बाजूंना चौकीत आणण्यात आले. चौकीच्या प्रभारींनी सांगितले की, दोन्ही पक्षांनी त्यांचा खर्च परत करण्याबाबत चर्चा केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage, Shocking, Social media, Top trending, Viral