मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ही अशी कसली मस्करी? लग्नाचा VIDEO पाहून नेटिझन्स भडकले

ही अशी कसली मस्करी? लग्नाचा VIDEO पाहून नेटिझन्स भडकले

लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 14 ऑक्टोबर : लग्न (Wedding video) म्हटलं की धम्माल, मजामस्ती, मस्करी आली. लग्नाचे असे बरेच मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नेटिझन्सही असे व्हिडीओ पाहून त्याची मजा घेतात. त्यावर आपल्याही भन्नाट कमेंट देतात. पण सध्या सोशल मीडियावर एका असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो पाहून नेटिझन्स भडकले आहेत (Wedding ritual video).

लग्नानमध्ये काही विधी-परंपरा असतात. अशाच एका लग्नाच्या विधीचा हा व्हिडीओ आहे. ज्यात पंडित विधी करता करता त्यांच्या अर्थही समजावत आहेत. पण त्याचवेळी पंडितजींनी दिलेल्या सल्ल्याला असं उत्तर मिळतं, ज्यामुळे लग्नात उपस्थितीतांना हसू तर येतं. पण हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स मात्र संतप्त झाले आहेत.

व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी शेजारी शेजारी बसले आहेत. लग्नाच्या विधी सुरू आहेत. पंडित विधी करता करता त्याची सविस्तर माहितीही देत आहेत.पंडित सांगतात की स्त्री जातीने एकटं जाऊ नये. पंडिताचा हा सल्ला ऐकून नवरीही शॉक होते. इतक्यात नवरीच्या बाजूने कुणीतरी याचं उत्तर देतं.

हे वाचा - VIDEO - छोट्याशा मेहुणीने केली भलीमोठी डिमांड, नवरदेवालाही फुटला घाम

नवरीच्या कुटुंबातून कुणा एका महिलेचा आवाज या व्हिडीओत ऐकू येतं. ती मजेतच म्हणते, कोणी नाही, तिच्यासोबत डॉगीसुद्धा जाईल. हे ऐकून एकच हशा पिकतो. नवरी खळखळून हसते. नवऱ्यालाही हसू आवरत नाही. आपल्या चेहऱ्यावर हात ठेवून तो हसताना दिसतो. इतकंच नव्हे तर हा सल्ला देणारे पंडितसुद्धा हसू लागतात आणि हरी ओम, हरी ओम असं म्हणतात.

हे वाचा - VIDEO - मेहुणीला पाहून दाजीचा सुटला ताबा; असं काही केलं की पाहुणेही पाहतच राहिले

पंडितजीच्या लग्नाच्या विधींना अशा पद्धतीने हॅक करता येऊ शकतं, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. आय डोंट से चीज इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेक युझर्सनी या व्हिडीओविरोधात प्रतिक्किया दिलेल्या आहेत.

First published:

Tags: Viral, Viral videos, Wedding, Wedding video