मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'आता हनीमूनही लग्नातच आटोपा', Wedding video पाहून नेटिझन्स शॉक

'आता हनीमूनही लग्नातच आटोपा', Wedding video पाहून नेटिझन्स शॉक

लग्नातच नवरा इतका उतावळा झाला की...

लग्नातच नवरा इतका उतावळा झाला की...

लग्नातच नवरा इतका उतावळा झाला की...

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 20 जुलै : लग्नामध्ये (Wedding) मजामस्ती असते. शिवाय प्रत्येक ठिकाणी लग्नाच्या पद्धती (Wedding video), परंपराही वेगवेगळ्या असतात. काही पद्धती तर इतक्या विचित्र असतात की आपण त्याचा कधी विचारही केला नसेल. सध्या अशाच एका लग्नाचा व्हिडीओ (Wedding viral video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) झाला असून खूपच चर्चेत आहे. लग्नात नवरा-नवरी भरमांडवात सर्वांसमोर असं काही करतात की ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

लग्नाच्या काही विधी होताना दिसत आहेत. नवरा नवरीच्या आजूबाजूला बऱ्याच महिला आहेत. या महिलांमध्ये नवरा-नवरी बसले आहेत. अशातच नवरा-नवरी काय करतात ते तुम्हीच पाहा (Groom kissing bride).

व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी समोरासमोर बसले आहेत. तितक्यात नवरा नवरीचा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरतो आणि तिला सर्वांसमोरच किस करतो. नवरी आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते. पण नवरा इतका उतावळा झाला आहे की, तो त्याला जे करायचं आहे ते करतोच. हे पाहून त्यांच्या आजूबाजूला असलेल्या सर्व महिलाही हसू लागतात.

हे वाचा - OMG! बोट आहे की जादूची छडी? तरुणाच्या इशाऱ्यावरच कसे नाचतात उंदीर पाहा VIDEO

आता नवऱ्याने सर्व महिलांसमोर नवरीला किस केलं आणि महिलासुद्धा त्यावर हसत आहेत, याचा अर्थ कदाचित ही लग्नातील एक परंपरा असू शकते. पण मग ही अशी कशी परंपरा आहे, असा प्रश्न नेटिझन्सना पडला आहे. official_niranjanm87 इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर बहुतेकांना धक्का बसला आहे. तर काही जणांनी यावर मजेशीर कमेंट येत केल्या आहेत. एका युझरने तर आता हनीमूनसुद्धा इथंच करा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

First published:

Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding couple, Wedding video