मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : ...अन् लग्नातच एकमेकांना KISS करू लागले नवरी-नवरदेव; या जोडप्याचं प्रेम जिंकेल तुमचं मन

VIDEO : ...अन् लग्नातच एकमेकांना KISS करू लागले नवरी-नवरदेव; या जोडप्याचं प्रेम जिंकेल तुमचं मन

आज आम्ही तुम्हाला आज एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्हीही विचारात पडाल, की हिंदू विवाह पद्धतीत ही प्रथा कधीपासून सुरू झाली

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 22 ऑक्टोबर : भारतीय पद्धतीनं केलेल्या पारंपारिक लग्नात (Traditional Indian Wedding) नवरी आणि नवरदेवानं (Bride and Groom) एकमेकांना किस करावं अशी कोणतीही प्रथा किंवा परंपरा नाही. मात्र, ख्रिश्चन पद्धतीनं केल्या गेलेल्या विवाहांमध्ये ही पद्धत आहे. या प्रथेनुसार, चर्चमध्ये झालेल्या लग्नानंतर पादरी नवरी आणि नवरदेवाला एकमेकांना किस (Groom Kisses Bride) करण्यासाठी सांगतात. पादरी म्हणतात, यू मे नाउ किस द ब्राईड. म्हणजेच आता तुम्ही नवरीला किस करू शकता. मात्र, हिंदू पद्धतीनं होणाऱ्या लग्नातही हिच प्रथा आली तर? VIDEO : नवरीच्या अदांवर वऱ्हाडीही फिदा; केलं असं काही की सगळेच बघत राहिले आज आम्ही तुम्हाला आज एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्हीही विचारात पडाल, की हिंदू विवाह पद्धतीत ही प्रथा कधीपासून सुरू झाली. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की विवाहसोहळा पार पडल्यानंतर नवरी आणि नवरदेवाचे कुटुंबीय पंडितांना यू मे नाउ किस द ब्राईड असं म्हणायला सांगतात. हे ऐकून पंडितही लाजतात. मात्र, कुटुंबीयांनी वारंवार आग्रह केल्यानं पंडीत हे बोलतात. परंतु हिंदी व्हर्जनमध्ये.
पंडितांनी नवरी आणि नवरदेवाकडे पाहून यू मे नाउ किस द ब्राईड हेच वाक्य हिंदीत हे दोघंही आता किस करतील असं म्हटलं. हे ऐकताच तिथे उपस्थित असलेले लोक हसू लागले. यानंतर नवरी आणि नवरदेवानं एकमेकांना किस केलं. अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ वेडिंग सूत्र नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, नाउ यू मे किस द ब्राईडचं सुपरकूल हिंदी व्हर्जन अतिशय मजेशीर आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.
First published:

Tags: Wedding couple, Wedding video

पुढील बातम्या