मराठी बातम्या /बातम्या /Viral /स्टेजवरच नवरीला घेऊन पडला; पण उठवण्याआधी तिथेच KISS करत बसला नवरदेव अन् मग.., Wedding Video

स्टेजवरच नवरीला घेऊन पडला; पण उठवण्याआधी तिथेच KISS करत बसला नवरदेव अन् मग.., Wedding Video

नवरदेव नवरीला स्टेजवरुन खाली घेऊन येत असतानाच अशी काही घटना घडते, जे पाहून सगळेच शॉक होतात. नवरदेव नवरीला उचलून स्टेजवरुन खाली आणत असतानाच त्याचा पाय घसरला आणि तो नवरीला घेऊन पायऱ्यांवर कोसळला

नवरदेव नवरीला स्टेजवरुन खाली घेऊन येत असतानाच अशी काही घटना घडते, जे पाहून सगळेच शॉक होतात. नवरदेव नवरीला उचलून स्टेजवरुन खाली आणत असतानाच त्याचा पाय घसरला आणि तो नवरीला घेऊन पायऱ्यांवर कोसळला

नवरदेव नवरीला स्टेजवरुन खाली घेऊन येत असतानाच अशी काही घटना घडते, जे पाहून सगळेच शॉक होतात. नवरदेव नवरीला उचलून स्टेजवरुन खाली आणत असतानाच त्याचा पाय घसरला आणि तो नवरीला घेऊन पायऱ्यांवर कोसळला

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नवी दिल्ली 09 जानेवारी : सोशल मीडियावर अनेकदा लग्नाचे विचित्र व्हिडिओ व्हायरल होतात. परंतु असे काही व्हिडिओ आहेत जे आपल्याला खळखळून हसण्यास भाग पाडतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये वरमालेच्या कार्यक्रमानंतर एक वर आपल्या वधूला उचलून घेऊन स्टेजवरुन खाली येत आहे. तेव्हाच अशी काही घटना घडते जी पाहून सगळेच हैराण होतात.

    दारू पिऊन टल्ली झाला बॉयफ्रेंड; गर्लफ्रेंडने जे केलं ते पाहून तुम्हीही तोंडात घालाल बोटं

    या घटनेनंतर नवरदेव अजिताबही न गोंधळता अगदी शांततेत असं काही करतो, जे पाहून सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू येतं. आता तुम्ही विचार करत असाल की अखेर नवरदेवानं असं काय केलं. त्यासाठी तुम्हाला हा व्हायरल व्हिडिओ पाहावा लागेल. वरमालेनंतर नवरी आणि नवरदेव फोटोशूट करत असतात. मात्र यादरम्यान नवरदेव नवरीला इम्प्रेस करण्यासाठी तिला उचलून घेतो आणि स्टेजवरुन खाली आणण्याचा प्रयत्न करतो.

    View this post on Instagram

    A post shared by joya jaan (@joyajaan816)

    नवरदेव नवरीला स्टेजवरुन खाली घेऊन येत असतानाच अशी काही घटना घडते, जे पाहून सगळेच शॉक होतात. नवरदेव नवरीला उचलून स्टेजवरुन खाली आणत असतानाच त्याचा पाय घसरला आणि तो नवरीला घेऊन पायऱ्यांवर कोसळला. सुदैवाने दोघांनाही दुखापत झाली नाही. यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी नवरदेवाने लगेचच नवरीच्या गालावर किस केलं.

    नवरदेवाने नवरीच्या गालावर किस करताच समोर उभा असलेल्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं. नवरदेवही नवरीकडे पाहून हसू लागला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. joyajaan816 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.

    आतापर्यंत १ लाख ९३ हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर ६२ लाख वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. लोक या व्हिडिओवर कमेंट करून प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलं, की लग्न करताय, की नाटकं? आता ती स्वतःच्या पायावर चालू शकते. जेव्हा खरंच तिला उचलून घेण्याची गरज पडेल तेव्हा तिला ते ओझं वाटू लागेल'

    First published:
    top videos

      Tags: Video Viral On Social Media, Wedding video