Viral Video: प्रत्येकाला हे बघायचं असतं की, वधूनं काय घातलं आहे आणि ती कशी तयार झाली आहे. इतकंच नाही तर मेकअपनंतर ती किती सुंदर दिसते आणि वराला इम्प्रेस करण्यासाठी ती काय करते.
नवी दिल्ली, 27 जानेवारी: लग्नाच्या दिवशी (wedding) वधू तिच्या एन्ट्रीसाठी खूप उत्सुक असते आणि तिनं आधीच अनेक प्लान आखलेले असतात. नातेवाईक आणि पाहुण्यांसमोर ती एंट्री घेते तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असतात. (Wedding Viral Video) प्रत्येकाला हे बघायचं असतं की, वधूनं काय घातलं आहे आणि ती कशी तयार झाली आहे. इतकंच नाही तर मेकअपनंतर ती किती सुंदर दिसते आणि वराला इम्प्रेस करण्यासाठी ती काय करते. एकमेकांना हार घालण्यापूर्वीच्या वधूच्या एन्ट्रीचा कार्यक्रम आता लोकांना आवडू लागला आहे. वर आपल्या नव्या नवरीची (new bride) वाट बघत बसतो की ती कधी स्टेजवर येईल आणि त्याच्यासोबत बसेल.
वधूच्या एन्ट्रीपूर्वीच भावूक झाला वर
सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधूच्या एन्ट्रीच्या वेळी काय होईल याचा अंदाज एका वराने आधीच वर्तवला आहे. वराला एवढी खात्री होती की वधूला पाहिल्यानंतर त्याच्या 99.9 टक्के डोळ्यांत अश्रू असतील. लग्न लागण्यापूर्वी वरानं ही भविष्यवाणी केली होती.
अरे देवा..! Maggi वरचा अत्याचार काही थांबेना; दुकानदारानं बनवला मॅगी पराठा
यानंतर वर जेव्हा स्टेजवर वधूची वाट पाहत उभा होता तेव्हा असेच काहीसे पाहायला मिळाले. वधूची एन्ट्री पाहून वराच्या डोळ्यात अश्रू आले. हे पाहून त्याच्या घरच्यांनीही त्याला शांत करायला सुरुवात केली.
वधूला पाहताच डोळ्यातून आले अश्रू
वराला रडताना पाहून त्याच्या घरच्यांनी त्याला गप्प करायला सुरुवात केली. वधूची एन्ट्री इतकी प्रेक्षणीय आहे की काय सांगू. जेव्हा वधू स्टेजच्या जवळ आली तेव्हा वराने तिचा हात धरला आणि नंतर स्टेजवर बोलावले. दोघांनी आनंदाने एकमेकांना हार घातला आणि नंतर पुढील विधी पार पाडले. व्हिडिओतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वराने सांगितल्याप्रमाणेच घडले.
हा व्हिडीओ पाहून समजू शकतो की, वर खूप भावूक झाला होता विटी वेडिंग नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram Reels) अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. हा व्हिडिओ 38 हजार लोकांनी लाइक केला आहे, तर लाखो लोकांनी पाहिला.
Published by:Pooja Vichare
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.