मराठी बातम्या /बातम्या /Viral /उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग! पाऊस थांबण्याचीही वाट बघेना नवरदेव, अनोख्या वरातीचा VIDEO

उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग! पाऊस थांबण्याचीही वाट बघेना नवरदेव, अनोख्या वरातीचा VIDEO

या संपूर्ण व्हिडिओमध्ये सगळ्यात मजेशीर बाब म्हणजे, नवरदेव घोड्यावर बसताच वरातीही आपल्या चपला हातात घेऊन छत्री डोक्यावर घेत नवरदेवाच्या मागे चिखलातून चालू लागतात.

या संपूर्ण व्हिडिओमध्ये सगळ्यात मजेशीर बाब म्हणजे, नवरदेव घोड्यावर बसताच वरातीही आपल्या चपला हातात घेऊन छत्री डोक्यावर घेत नवरदेवाच्या मागे चिखलातून चालू लागतात.

या संपूर्ण व्हिडिओमध्ये सगळ्यात मजेशीर बाब म्हणजे, नवरदेव घोड्यावर बसताच वरातीही आपल्या चपला हातात घेऊन छत्री डोक्यावर घेत नवरदेवाच्या मागे चिखलातून चालू लागतात.

नवी दिल्ली 01डिसेंबर : सोशल मीडियावर (Social Media) सतत मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Video Viral) होत राहतात. यातील काही व्हिडिओ हैराण करणारे असतात तर काही व्हिडिओ असे असतात जे पाहून हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. यात नवरदेव अशा स्थितीमध्ये आपली वरात काढतो, जे पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

व्हिडिओमध्ये नवरदेव छत्री घेऊन पावसात घोड्यावर बसून आपल्या नवरीबाईला आणायला निघाला आहे. यासोबत नातेवाईक आणि पाहुणेही नवरदेवाच्या मागे पाण्यात भिजतच निघाले आहेत. व्हिडिओमधील हे दृश्य अतिशय मजेशीर आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये (Funny Video of Groom) दिसतं की मुसळधार पाऊस सुरू आहे आणि जिकडे-तिकडे चिखलच दिसतो. मात्र नवरदेव थोडीही वाट पाहायला तयार नाही आणि पावसातच तो आपल्या नवरीला आणायला निघाला.

या संपूर्ण व्हिडिओमध्ये सगळ्यात मजेशीर बाब म्हणजे, नवरदेव घोड्यावर बसताच वरातीही आपल्या चपला हातात घेऊन छत्री डोक्यावर घेत नवरदेवाच्या मागे चिखलातून चालू लागतात. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, बहुतेक या साहेबांना खूपच कष्टाने लग्नासाठी मुलगी मिळाली आहे. त्यामुळे तो जराही रिस्क घ्यायला तयार नाही.

View this post on Instagram

A post shared by MEMES.BKS (@memes.bks)

दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, मी दावा करतो की हा नवरदेव पुढे जोरू का गुलाम होणार. तर आणखी एकाने लिहिलं, प्रकरण प्रेमाचं दिसतंय, त्यामुळेच नवरदेव उतावळा झाला आहे. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर memes.bks नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला अनेक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे.

First published:
top videos

    Tags: Bridegroom, Wedding video