Home /News /viral /

VIDEO: लग्नाआधीच नवरदेवाने स्टेजवर येत सर्वांसमोर दिलं अजब गिफ्ट; पाहून नवरीही शरमली

VIDEO: लग्नाआधीच नवरदेवाने स्टेजवर येत सर्वांसमोर दिलं अजब गिफ्ट; पाहून नवरीही शरमली

नवरीबाई स्टेजवर उभी असतानाच नवरदेवाने तिला असं सरप्राईज दिलं, की सगळेच बघत राहिले आणि नवरीही शरमली

  नवी दिल्ली 20 जानेवारी : आपल्या लग्नात काहीतरी वेगळं करायचं, अशी जवळपास प्रत्येक नवरी आणि नवरदेवाची इच्छा असते. हे दोघंही आपलं लग्न नेहमी स्मरणात राहावं, यासाठी काहीतरी हटके करण्याच्या प्रयत्नात असतात. नवरदेव अनेकदा यासाठी लग्नात नवरीला सरप्राईज देण्याच्या प्रयत्नात असतो. तर, नवरीही काहीतरी खास प्लॅनिंग करत असते. कोणी डान्स करून, कोणी गाणी म्हणून तर काहीवेळी नवरीबाई अनोख्या पद्धतीने मंडपात एन्ट्री (Bride Entry) करून आपल्या पार्टनरला खुश करण्याचा प्रयत्न करते. सध्या अशाच एका साखरपुड्यातील व्हिडिओ व्हायरल (Engagement Video) होत आहे. पहिल्याच भेटीत रोमान्स करून गायब झाला व्यक्ती; मग सोशल मीडियामुळे उघड झालं सत्य इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरी आणि नवरदेव (Bride and Groom Video) लग्नाआधी साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी स्टेजवर उभा आहेत. यादरम्यान नवरीबाई स्टेजवर उभी असतानाच नवरदेवाने तिला असं सरप्राईज दिलं, की सगळेच बघत राहिले आणि नवरीही शरमली. नवरदेवाने साखरपुड्याच्या आधी अशी वस्तू लपवून ठेवली होती, ज्याबद्दल कोणाचा कल्पना नव्हती. नवरीने आपल्या नवरदेवाच्या हातात अंगठी घातली आणि नंतर नवरदेवाने अंगठी तिच्या हातात घालावी, यासाठी वाट बघत राहिली. यादरम्यान नवरदेवाने असं सरप्राईज दिलं, ज्याबद्दल कोणीही विचार केला नव्हता.
  नवरदेवाने अचानक हातकडी आणली आणि ही हातकडी आपल्या हातात घालण्याची मागणी नवरीकडे करू लागला. सुरुवातीला हे पाहून नवरीबाई लाजली, मात्र नंतर ती ही हातकडी त्याला घालण्यासाठी तयार झाली. नवरदेवानेही नवरीला ही हातकडी घातली आणि यानंतर तिच्या बोटात अंगठी घातली. हातकडी घालण्याचा नवरदेवाचा उद्देश हा होता की आता ती पूर्णपणे त्याची झाली आहे आणि त्याला सोडून जाऊ शकत नाही.

  गर्लफ्रेंडसाठी घेतली 4 कोटीची अंगठी पण...; तिचं सत्य समोर येताच हादरला तरुण

  हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर विटी वेडिंग नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. जवळपास 9 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर हजारो लोकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Bridegroom, Wedding video

  पुढील बातम्या