Home /News /viral /

काय म्हणावं या नवरदेवाला! नवरी राहिली बाजूला, आधी स्वतःच नट्टापट्टा करायला बसला; पाहा VIDEO

काय म्हणावं या नवरदेवाला! नवरी राहिली बाजूला, आधी स्वतःच नट्टापट्टा करायला बसला; पाहा VIDEO

कधी पाहिलाय का असा नवरा?

  मुंबई, 03 ऑक्टोबर : आपल्या लग्नाचा (Wedding video) आनंद तसा प्रत्येकाला असतोच. पण तरुणांपेक्षा (Groom video) तरुणी (Bride video) थोड्या जास्तच उत्साही असतात. कारण त्यांना लग्नात एकदम हटके दिसायचं असतं. यासाठी लग्न ठरताच लग्नाचा ड्रेस, ज्वेलरी, मेकअप याची तयारी सुरू होते (Wedding makeup video). आतापर्यंत मेकअप करणाऱ्या ब्राइड (Bride makeup video) तुम्ही पाहिल्या असतील पण कधी इतका वेळ मेकअप करणारा ग्रुम (Groom makeup video) कधी पाहिला आहे का? नट्टापट्टा करणाऱ्या एका नवरदेवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  होतो आहे. ज्यामध्ये त्याने नवरीच्या आधीच आपली तयारी केली आहे. लग्नासाठी तो इतका उतावळा आहे की नवरीआधी तो मेकअप करायला बसला आहे.
  एरवी लग्नात तयार होण्यासाठी नवरीला जास्त वेळ लागतो. नवरदेवाची तशी काही खास तयारी नसते. पण या व्हिडीओतील नवरदेवाची मात्र बातच वेगळी आहे. हे वाचा - मेहुणीला पाहताच सुटला भावोजींच्या मनाचा ताबा, सर्वांसमोरच केला धिंगाणा; VIDEO नवरीनेच का मेकअप करावा, नवऱ्याने का नाही, असं म्हणून तो नवरीआधी स्वतःचा मेकअप करायला बसतो. व्हिडीओत पाहू शकता जर मुली मेकअप करू शकतात तर मुली काही नाही, असं तो बोलतो. त्यानंतर नवरी त्याला उठवायला येते. ती त्याला सांगते की अरे उठ. मला करू दे रे मेकअप लवकर उठ. तूच तयार होणार का मी नको होऊ का तयार मी अशीच येऊ का नवरदेव बोलतो चल यार तयार होऊ दे तू अशीच ये काही हरकत नाही. मी तयार होऊन पळून जाणार आहे. तू तुझं बघ. हे वाचा - VIDEO: मला सासरी नाही जायचं! पाठवणीवेळीच घराच्या छतावर चढली नवरी अन्... दुल्हनिया या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जेव्हा आपल्या लग्नादिवशी नवरदेव नवरीपेक्षा जास्त उत्साही असतो, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding video

  पुढील बातम्या