मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नवरीबाईचा VIDEO पाहून हादरला नवरदेव; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला घटस्फोट

नवरीबाईचा VIDEO पाहून हादरला नवरदेव; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला घटस्फोट

लग्नात एका व्हिडीओतून नवरीबाईचं असं सत्य समजलं की नवरदेवासह पाहुण्यांनाही धक्का बसला.

लग्नात एका व्हिडीओतून नवरीबाईचं असं सत्य समजलं की नवरदेवासह पाहुण्यांनाही धक्का बसला.

लग्नात एका व्हिडीओतून नवरीबाईचं असं सत्य समजलं की नवरदेवासह पाहुण्यांनाही धक्का बसला.

    मुंबई, 11 ऑगस्ट : लग्नाचे बरेच किस्से, फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असंच एक लग्न चर्चेत आलं आहे. या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घटस्फोट झाला आहे. कारण लग्नात नवरदेवाला नवरीबाईचं असं सत्य समजलं की तो हादरला. लग्नात एका व्हिडीओतून नवरीबाईचा खरा चेहरा समोर आला. त्यामुळे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाने तिला घटस्फोट दिला आहे. तुम्ही सध्या बऱ्याच लग्नसोहळ्यात पाहिलं असेल की एका स्क्रिनवर नवरा-नवरीचे व्हिडीओ दाखवले जातात. यात त्या दोघांचे बालपण, कुटुंबासोबतचे क्षण आणि त्यानंतर नवरा-नवरीचे लग्नाआधीचे काही रोमँटिक क्षण असतात. चीनच्या फुजिआनमधील एका कपलच्या लग्नातही त्यांचा असाच व्हिडीओ दाखवला जात होता. त्यावेळी नवरा-नवरी दोघंही स्टेजवर होते. दोघांचे असे काही खास क्षण पाहुणेही आनंदाने पाहत होता. काही मजेशीर क्षण होते जे पाहून सर्वजण हसत होते. तर काही इमोशन क्षण होते जे पाहून सर्वजण भावुक होते. पण जसजसा व्हिडीओ पुढे केला तेव्हा त्यात असं दृश्य दिसलं की ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. व्हिडीओ पाहून हसत आनंदाने टाळ्या वाजवणारे पाहुणे काही वेळाने हादरले आणि शांतच बसले. कारण त्या व्हिडीओतून नवरीबाईची पोलखोल झाली होती. हे वाचा - लग्नात नवरदेवाचं कृत्य पाहून भडकली नवरीबाई, भरमंडपातच केली धुलाई; VIDEO VIRAL या व्हिडीओत नवरीबाई तिच्या दाजींसोबत रोमान्स करताना दिसली. ती आपल्या दाजींसोबत बेडरूममध्ये होती. ते दोघं एकमेकांना किस करत होते. हे पाहून सर्वजण शॉक झाले. नवरदेवही हादरला. त्याने  तिथंच नवरीबाईला याचा जाब विचारला. हे सर्व पाहून नवरीबाईही भडकली. आपली पोलखोल होताच ती उटल नवरदेवावर संतप्त झाली आणि त्याच्याशी भांडण करू लागली. त्यानंतर नातेवाईक आणि पाहुण्यांनी मध्यस्थी करून त्यांचं तिथलं भांडण मिटवलं. पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. नवरदेवाने घटस्फोटासाठी अर्ज केल्याची माहिती मिळते आहे. हे वाचा - आधी शांतपणे ऐकून घेतलं नंतर एकटीनेच दोघींना धुतलं; महिलांच्या फायटिंगचा VIDEO तुफान VIRAL हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी लग्नाआधी बिच्चारा नवरा अशा नवरीपासून वाचला आहे, अशीच प्रतिक्रिया दिली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Viral, Viral videos, Wedding

    पुढील बातम्या