मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नवरदेवाने लग्नातील आवडीचे पदार्थ रद्द केल्याने नाराज झाली नवरी; घेतला मोठा निर्णय

नवरदेवाने लग्नातील आवडीचे पदार्थ रद्द केल्याने नाराज झाली नवरी; घेतला मोठा निर्णय

माझा होणारा नवरा हा 31 वर्षांचा आहे आणि मी 25 वर्षांची आहे. आम्ही लवकरच लग्न करणार होतो. आम्ही लग्नाचे नियोजनही सुरू केले.

माझा होणारा नवरा हा 31 वर्षांचा आहे आणि मी 25 वर्षांची आहे. आम्ही लवकरच लग्न करणार होतो. आम्ही लग्नाचे नियोजनही सुरू केले.

माझा होणारा नवरा हा 31 वर्षांचा आहे आणि मी 25 वर्षांची आहे. आम्ही लवकरच लग्न करणार होतो. आम्ही लग्नाचे नियोजनही सुरू केले.

  • Published by:  News18 Desk
लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट असते. मात्र, एका लग्नादरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या फूड मेनूमध्ये आपल्या आवडीचे पदार्थ नसल्यामुळे एका वधूने लग्न मोडले. वधूने सांगितले की तिच्या पाठीमागे, वराने लग्नासाठी सेट केलेला मेनू बदलला होता आणि तिच्या आवडत्या जेवणाचे पदार्थरद्द केले. यामुळे तिने हे लग्न मोडले. आता लोक नववधूच्या लग्न मोडण्याच्या निर्णयाचे खूप कौतुक करताना दिसत आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण - SarahJake2022 नावाच्या युजरने Reddit वर तिचे लग्न मोडल्याबाबत सांगितले. तिने लिहिले की, माझा होणारा नवरा हा 31 वर्षांचा आहे आणि मी 25 वर्षांची आहे. आम्ही लवकरच लग्न करणार होतो. आम्ही लग्नाचे नियोजनही सुरू केले. जेवणाचा मेन्यू सोडून बाकी सर्व गोष्टींवर परस्पर सहमती होती. मी आणि माझे कुटुंब शाकाहारी आहोत. तसेच प्राणी किंवा त्यांच्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खात नाहीत. तिने पुढे सांगितले की, माझा होणारा नवरा आणि आणि त्याचे कुटूंब अगदी उलट आहे. ते लोक मांसाहारी प्रेमी आहेत. मात्र, याबाबत माझी काही तक्रार नाही. पण तिने सांगितले, तिला फूड मेनूमध्ये चार किंवा पाच शाकाहारी पर्याय हवे होते. मात्र, तिचा होणारा नवऱ्याचा याला नकार होता. तसेच 'पैशाचा अपव्यय' आणि 'हे खरे अन्न नाही' वगैरे असे म्हणात होता. मात्र, मी त्याला सांगितले की, मला या मुद्द्यावर वाद घालायचा नाही. तसेच हेच अंतिम आहे. हेही वाचा - गर्दीत बाहेर न जाता घरीच एन्जॉय करता येईल Long Weekend, 10 टिप्स करा फॉलो मात्र, काही दिवसांनी मला माहित झाले की, माझ्या माहित न करता, लग्नाच्या जेवणातील सर्व पदार्थ शाकाहारी पदार्थ यादी रद्द केले. यानंतर मी त्याला फोन केला तर तो ऑफिसमध्ये होता. तसेच त्याने माझा फोन घेतला नाही. त्यामुळे थेट त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचली आणि त्याला रागावली. तो म्हणाला की, ही त्याच्या आईची कल्पना होती. यानंतर त्याने मला घरी पाठवून दिले. मात्र, हे प्रकरण पुढे वाढतच गेले. मात्र, हे प्रकरण पुढे वाढतच गेले. या पोस्टवर आतापर्यंत 3 हजार पेक्षा जास्त कमेंट आल्या आहेत. अनेक जणांनी तिने लग्न मोडल्याच्या निर्णयाचे स्वागत करत आहेत.
First published:

Tags: Marriage

पुढील बातम्या