मुंबई, 03 मे : पुष्पा फिल्ममधील सामी सामी गाण्यावर श्रीवल्लीची डान्स स्टेप्स जबरदस्त फेमस झाली
(Pushpa Movie Songs). या गाण्याची हुक स्टेप लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत बऱ्याच जणांनी केली. सोशल मीडियावर याचे व्हिडीओही व्हायरल झाले. आता एक आजीबाईही हे गाणं ऐकताच स्वतःला रोखू शकली नाही. तिने या गाण्यावर इतका जबरदस्त डान्स केला आहे की श्रीवल्लीचे ठुमकेही तुम्ही विसराल
(Old Woman Dance Saami Saami).
सामी सामी गाणं
(Saami Saami Song Video) म्हटलं की श्रीवल्लीची ठुमका स्टेप्सच डोळ्यासमोर येत. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता तुम्हाला हे गाणं ऐकल्यानंतर यापुढे कदाचित या आजीबाईचा डान्सच समोर येईल. इतका या गाण्यावर या आजीने सॉलिड डान्स केला आहे.
हे वाचा - कधीच पाहिली नसेल अशी विचित्र चोरी; Bike chori चा Shocking Video Viral
व्हिडीओत पाहू शकता सामी सामी गाणं लागताच वृद्ध महिला आऊट ऑफ कंट्रोल होते. तिचं शरीर थिरकू लागतं. नववारी साडी नेसलेली ही आजी आपल्याच अंदाजात बिनधास्तपणे नाचताना दिसते. ती एकटीच डान्स करत आहे, तिच्यासोबत दुसरं डान्स करणारं कुणीच नाही. किंबहुना आजीचा डान्स पाहण्यातच सर्वजण मग्न झाले असावेत. तिच्यासोबत डान्स करण्याची दुसऱ्या कुणाची हिंमतच झाली नसावी.
आजीचं वय पाहिलं तर त्यानुसार ती डान्स करते आहे, तो खूपच जबरदस्त आहे. ती बिलकुल थकलेली दिसत नाही. तिचा हा व्हिडीओ पाहून तरुणांनाही लाज वाटेल.
हे वाचा - मोठ्या दिमाखात Naatu Naatu गाण्यावर करत होता डान्स; तोल जाताच धाडकन नाल्यात कोसळला, Funny Video
giedde नावाच्या इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. आजीच्या स्टॅमिनाला सर्वांनी दाद दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.