मुंबई, 01 डिसेंबर : सोशल मीडियावर (Social media) सध्या देख तुनी बायको... (Dekh tuni bayko kashi nachi) हे गाणं तुफान व्हायरल होतं आहे. इन्स्टाग्रामवर या गाण्याचे बरेच रिल्स (Dekh tuni bayko kashi nachi reels) पाहायला मिळत आहेत. लहानांपासून तरुणांपर्यंत सर्वजण या गाण्यावर आपले डान्स व्हिडीओ (Dekh tuni bayko kashi nachi dance video) पोस्ट करत आहेत. या गाण्यावर ताल धरण्याचा मोह आवरला नाही (Old woman dance on Dekh tuni bayko kashi nachi).
सर्वांना वेड लावणाऱ्या या गाण्यावर एका वृद्ध महिलेनेही ताल धरला आहे. आजीने या गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावले आहेत. आजीचा डान्स पाहून नेटिझन्सनही थक्क झाले आहेत. या आजीने तर या गाण्यात भल्याभल्यांना मागे टाकलं आहे. या गाण्यात आजीला साथ दिली ती नातवाने. नातसोबतच तिने या गाण्यावर ठेका धरला आहे.
View this post on Instagram
अजित वाघमारे नावाच्या तरुणाने आपल्या ajit_waghmare0814 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. लव्ह यू आजी असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओत नाचणारा तरुण हा अजित आहे आणि त्याच्यासोबत नाचणारी ही त्याची आजी.
हे वाचा - WOW! डॉल्फिनने गाण्यावर लगावले जबरदस्त ठुमके; Dolphin चा Dance video एकदा पाहाच
या वयातही आजीचा जोश पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. नेटिझन्सना आजीचा हा भन्नाट डान्स चांगलाच आवडला आहे. आजीबाईने नेटिझन्सचं मन जिंकलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Instagram post, Viral, Viral videos