प्रेम आणि जिद्दीने पत्नीच्या कॅन्सरलाही हरवलं! 77 वर्षीय आजोबांनी व्हायोलिन वाजवून जमवले उपचारासाठी पैसे

प्रेम आणि जिद्दीने पत्नीच्या कॅन्सरलाही हरवलं! 77 वर्षीय आजोबांनी व्हायोलिन वाजवून जमवले उपचारासाठी पैसे

इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे (Social Media) अनेकांच्या हृदयस्पर्शी कहाण्या लोकांच्या समोर येत आहेत. पूर्वी माध्यमांनी दखल घेतली तरच एखाद्याची कहानी लोकांना वाचायला, पहायला मिळायची. मात्र, सोशल मीडियामुळे आता हे बंधन राहिलेले नाही.

  • Share this:

कोलकाता, 17 एप्रिल: आज-काल इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे (Social Media) अनेकांच्या हृदयस्पर्शी कहाण्या लोकांच्या समोर येत आहेत. पूर्वी माध्यमांनी दखल घेतली तरच एखाद्याची कहाणी लोकांना वाचायला, पहायला मिळायची. मात्र, सोशल मीडियामुळे आता हे बंधन राहिलेले नाही. सर्वसाधारणपणे मनाला भावणारा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल होऊन अनेकांपर्यंत पोहचतो. अशीच व्हायरल झालेली एका वयोवृद्ध जोडप्याची ही कहाणी आहे. कोलकातामध्ये (Kolkata) राहणारे स्वप्न सेठ यांनी आपल्या पत्नीसाठी जे काही केले ते पाहून अनेकजण भावुक झाले आहेत.

इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, स्वप्न सेठ यांच्या पत्नीला कॅन्सर (Cancer) झाला होता. ते पत्नीचा इलाज करण्यासाठी नियोजन करत होते. उपचारांच्या खर्चासाठी पैसे कसे जमवावेत? हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. सध्या दवाखान्यातील उपचारांचे आणि त्यातही एखादे ऑपरेशन करायचे म्हटले तर त्याचा खर्च ऐकून सर्वसामान्यांना घाम फुटतो. आपल्या प्रिय व्यक्तीला वाचवायचे तरी आहे, मात्र पैशांची तरतूद करायची कशी? या विचारात स्वप्न सेठ होते. मात्र, अखेर त्यासाठी त्यांनी कला आणि संगीताची मदत घ्यायची ठरवले. त्यांनी विविध ठिकाणी कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन व्हायोलिन वाजवायचे काम सुरू केले आणि त्यातून मिळणारे पैसे उपचारासाठी जमवले. सोशल मीडियावर त्यांची ही कहाणी व्हायरल होत आहे.

2002 साली घडलं असं...

त्यांच्या पत्नीला 2002 साली कॅन्सर झाला होता. बलराम डे स्ट्रीट कोलकाता येथे हे वयोवृद्ध जोडपे राहते. तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2019 मध्ये त्यांच्या पत्नीची तब्येत सुधारली असल्याची माहिती समोर आली आहे. पैसे जमल्यानंतर त्यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयामध्ये (Tata memorial hospital mumbai) पत्नीचा इलाज केला.

(हे वाचा -COVID-19 2nd Wave: 100 दिवस टिकणार कोरोना विषाणूची दुसरी लाट, 70 टक्के लसीकरण अत्यावश्यक; तज्ज्ञांचा दावा)

पत्नीची तब्येत सुधारल्यानंतरही त्यांनी संगीताशी नाते आजही तोडलेले नाही. ते कार्यक्रमांमध्ये अजूनही संगीत वाजवतात. पूर्वी ते पेंटर म्हणूनही काम करायचे. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कॅन्सरसारखी बिकट परिस्थिती समोर आली असतानाही त्यांनी संगीताद्वारे लोकांचे मनोरंजन करणे थांबवले नाही, त्यांचे हे काम आजही सुरूच असून त्यांच्या व्हायोलिन वाजवण्याला लोक दाद देतात.

Published by: News18 Desk
First published: April 17, 2021, 12:29 PM IST

ताज्या बातम्या