मुंबई, 18 जून : काम की आपला छंद? बऱ्याचदा आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी कामाच्या वेळेत करता येत नाहीत. अशावेळी आपल्या मूड जातो किंवा ताण येतो. पण एका आजोबांनी मात्र काम करता करता आपली छंद जोपासण्याची इच्छा पूर्ण केली. त्यांचा भन्नट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता वृद्ध व्यक्ती ताशा वाजवत आहे आणि आजूबाजूला लोक छान डान्स करत आहेत. या सर्व मनसोक्त डान्स करणाऱ्या लोकांना पाहून ताशा वाजवणाऱ्या वृद्ध व्यक्तीलाही डान्स करण्याचा मूड होतो. ताशा सोडून तेही नाचायला लागतात. त्यांच्या या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ताशा वाजवणं हे त्यांचं काम असल्यानं अर्थात त्यांनी मनसोक्त नाचता येत नव्हतं. त्यांच्या सोबत असलेल्या दुसऱ्या माणसानं त्यांना कामाची आठवण करून दिली. त्यामुळे आजोबांना डान्स सोडून ताशा वाजवावा लागला. इच्छा पूर्ण कराची की काम या द्विधा मनस्थितीत ते होते. त्यामध्येच त्यांनी डान्स करून घेतला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओला आतापर्यंत 36 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 500 हून अधिक लोकांनी या व्हिडीओला शेअर केलं आहे. 3.5 हजार लोकांनी लाईक केलं आहे.